मराठी बातम्या /बातम्या /Viral /''माझ्याशी मैत्री कर, मी तुला नापास होऊ देणार नाही.'' म्हणत शिक्षकाकडून विद्यार्थीनीशी अश्लील कृत्य

''माझ्याशी मैत्री कर, मी तुला नापास होऊ देणार नाही.'' म्हणत शिक्षकाकडून विद्यार्थीनीशी अश्लील कृत्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या प्रकरणार शाळेनेही आपल्या स्तरावर तपास केला आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक त्याच दिवसापासून शाळेतून सुटी घेऊन फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 05 फेब्रुवारी : शिक्षका नेहमीच चांगले विद्यार्थी किंवा लोक घडवतात असं म्हणतात. कारण त्यांना चांगली शिकवण देणं आणि गोष्टी शिकवणं हे शिक्षकाचं काम असतं असं म्हणतात. त्यामुळे मुलांना घडवणारा गुरु नेहमीच त्यांच्या आयुष्यात उच्चस्थानी असतो, पण एका शिक्षकाणं या नात्याला काळीमा फासण्याचं काम केलं आहे.

हे प्रकरण हरियाणातील आहे. येथील एका सरकाळी शाळेतील शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. या शिक्षकाने तिच्यासोबत अश्लील कृत्य देखील केलं असल्याचं म्हटलं जात आहे. ही घटना समोर येताच त्या परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.

हे ही वाचा : लोकांना मारुन ऍसिडमध्ये वितळवायचा, अखेर 16 वर्षानंतर पोलिसांकडून खेळ खल्लास

सध्या या प्रकरणाती आरोपी फरार असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.

डीएसपी गुरमेल सिंग यांनी सांगितले की, विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणार शाळेनेही आपल्या स्तरावर तपास केला आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक त्याच दिवसापासून शाळेतून सुटी घेऊन फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शिक्षिकाने मुलीचा हात धरून 'तू अभ्यासात खूप कमकुवत आहेस, माझ्याशी मैत्री कर, मी तुला नापास होऊ देणार नाही', असं सांगितलं, त्यानंतर या मुलीसोबत अश्लील कृत्य केलं. असा आरोप करण्यात आला आहे.

या मुलीचे वय 17 वर्ष आहे आणि ती 11वीच्या सरकारी शाळेत शिकत आहे. विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, येथे कार्यरत रसायनशास्त्राचे शिक्षक तिच्यावर अनेक दिवसांपासून चुकीची नजर ठेवून होते. ''अनेक वेळा मला विषय समजत नसल्याचे त्यांनी मला सांगितले आणि म्हणाले की, तू माझ्याशी मैत्री कर, मी तुला नापास होऊ देणार नाही.''

शाळा सुटल्यानंतर या मुलीने शिक्षिकेच्या या कृत्याबद्दल मैत्रिणीला सांगितले. त्यावर मित्राने संपूर्ण घटनेची माहिती शाळेतीलच एका महिला शिक्षिकेला दिली. प्रकरणाची प्रगती पाहून शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे प्रकरण बालिका समितीकडे चौकशीसाठी सोपवले. पीडित मुलीने हा सगळा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी शाळेत जाऊन शाळेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.

First published:

Tags: Crime, School student, Social media, Social media trends, Teacher, Top trending