मुंबई, 05 फेब्रुवारी : काही गुन्हेगार इतके हुशार असतात की, ते आपल्या गुन्हाचा कोणताच पुरावा सोडत नाहीत. असंच काहीसं प्रकरण समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एक असा गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला आहे. जो लोकांना मारुन त्यांच्या बॉडीला ऍसिडमध्ये ठेवायचा आणि त्यांच्या पुराव्यासह त्याचं अस्तित्व मिटवून टाकायचा, ज्यामुळे पोलिसांना देखील त्याचा कोणताच पुरावा मिळायचा नाही. पण ते म्हणतात ना की, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलीस देखील कमी नाही. ते कसंही करुन गुन्हेगाराचा शोध लावणारच. तसंच या व्यक्तीसोबत घडलं. त्याने पकडलं जाऊ नये म्हणून प्लान तर चांगला आखला पण अखेर तो पकडला गेलाच. हे ही पाहा : तरुण तरुणीकडून कुत्र्याच्या पिल्लाच्या जीवाशी खेळ, Video पाहून अंगावर येईल काटा फ्रान्समधील एका हॉटेलमध्ये पिझ्झा बनवणाऱ्या धोकादायक गुन्हेगाराला इंटरपोलच्या पोलिसांनी पकडले आहे. या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांना बराच वेळ शोधमोहीम राबवावी लागली. हा गुन्हेगार जेव्हा खून करायचा तेव्हा कोणाला कळू नये म्हणून मृतदेह ऍसिडने वितळायचा. या गुन्हेगाराच्या कारनाम्यांची यादी खूपच भयानक आहे जी आता समोर येत आहे. या गुन्हेगाराचे नाव एडगार्डो ग्रेको आहे. एडगार्डो ग्रेको 63 वर्षांचा असून तो गेल्या 16 वर्षांपासून फरार होता. अखेर गुरुवारी पोलिसांनी त्याला फ्रान्समधील हॉटेलमधून अटक केली. तो त्याच्या काळात माफिया बॉस म्हणून प्रसिद्ध होता आणि अनेक वर्षांपासून त्याचे नाव बदलून या हॉटेलमध्ये काम करत असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा तो हॉटेलमध्ये पिझ्झा बनवत होता. माहितीनुसार, फ्रान्समधील लियोन येथील इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेने म्हटले आहे की, एडगार्डो ग्रेकोने केलेली हत्या माफिया युद्धाचा भाग होती. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला हे युद्ध इटलीमध्ये सुरू झाले. त्याने दोघांना बेदम मारहाण केली होती आणि त्यांचे मृतदेह कोणाला सापडू नयेत म्हणून त्याने अत्यंत क्रूर पद्धतीचा वापर केला. त्याने या मृतदेहांवर अॅसिड टाकून त्यांचं शरीर वितळवून टाकलं. हा प्रकार उघडकीस येताच न्यायालयाने या प्रकरणी ग्रीकोला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षेपासून वाचण्यासाठी तो तुरुंगातून पळून गेला आणि 16 वर्षे पोलिसांना चकमा देत राहिला.
ग्रीको गेल्या तीन वर्षांपासून पिझ्झा शेफ म्हणून काम करत असल्याचेही एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. तेथून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचा इटलीतील सर्वात शक्तिशाली संघटित गुन्हेगारी गट Ndrangheta शी देखील संबंध होता.