हैदराबाद, 17 सप्टेंबर : दबंग आणि सिंघम फिल्ममधील पोलिसाच्या स्टाईलचे तर तुम्ही दिवाने आहातच. अशाच एका पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. अगदी दबंग, सिंघमप्रमाणेच या पोलिसानेही भारी काम केलं आहे. एका चोराचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्याला पकडलं आहे (Police catch the thief). यावेळी हा पोलीस जखमीही झाला आहे (Police catch the thief video). अगदी सिनेमात दाखवतात तसा चोर- पोलिसांचा थरारक पाठलाग प्रत्यक्षात फार कमी वेळा पाहायला मिळतो. एका बाजारात चोर-पोलिसात सिनेस्टाईल थरार रंगला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे (Police thief cctv video). ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या पोलिसाचं कौतुक केलं जातं आहे.
व्हिडीओत पाहू शकता, हे एक मार्केट आहे. जिथं रस्त्यावर काही गाड्या आणि बरेच लोक दिसत आहेत. गजबजलेल्या या रस्त्यावर थोड्याच वेळात तुम्हाला चोर पोलिसातील थरार दिसतो. हे वाचा - बसल्या बसल्याच चोराला पकडून दिलं; फिल्ममधील नव्हे तर रिअल लाइफ हिरोचा VIDEO समोरच्या रस्त्यावरून एक व्यक्ती धावत येते, ती आपल्या उजव्या बाजूला वळते आणि पळत सुटते. त्यानंतर त्या व्यक्तीचा पाठलाग करत एक पोलीसही धावत येतो. धावता धावता पोलीस रस्त्यावर पडतो. त्याच्या हाताला जखम होते, त्यातून रक्त येतं. पण पोलीस आपल्या कर्तव्यापेक्षा त्याला दुसरं काहीच महत्त्वाचं नसतं. आपल्याला हाताला लागलं तरी तो तसाच उठतो आणि तो पुन्हा त्या चोराच्या मागे धावत जातो. आयपीएस ऑफिसर प्रिया रावली यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार आर प्रसाथ असं या पोलिसाचं नाव आहे. हा पोलीस तामिळनाडूच्या पट्टुक्कोट्टाईत कार्यरत आहे. ‘आर प्रसाथ यांचा खूप अभिमान वाटतो आहे’, असं कौतुक त्यांनी केलं आहे. हे वाचा - संताप येईल, किळस वाटेल! क्रिस्पी टोस्ट आवडीने खात असाल तर हा VIDEO जरूर पाहा याआधी चेन्नईतील असा एक व्हिडीओ समोर आला होता. चेन्नईतील पोलीस रमेश अँटलिन यांनी बाईकवरून धूम स्टाइल पळणाऱ्या चोरांना पकडलं. मोबाईल चोरून हे चोर बाईकवरून पळत होते, तेव्हा रमेश यांनी त्यांचा पाठलाग केला, रमेश या चोरांपर्यंत पोहोचले.
It’s not a scene from any movie. But the real life hero SI Antiln Ramesh single handed chasing and catching a mobile snatcher riding a stolen bike. Follow up led to arrest of three more accused and recovery of 11 snatched/stolen mobiles. pic.twitter.com/FJYdoma7I4
— Mahesh Aggarwal, IPS (@copmahesh1994) November 27, 2020
पण रमेश एकट्यानेच ही धरपकड करत असताना त्यातला एक चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. पण दुसऱ्याला रमेश यांनी पकडलं. पळून गेलेल्या चोराच्या मुसक्याही नंतर बांधण्यात आल्या. चेन्नईचे पोलीस आयुक्त महेश अग्रवाल यांनी स्वतः पोलीस उपनिरीक्षक अँटलिन रमेश यांचं कौतुक केलं आणि हा व्हिडीओ Twitter वर शेअर केला.