Home /News /viral /

बसल्या बसल्याच चोराला पकडून दिलं; फिल्ममधील नव्हे तर रिअल लाइफ हिरोचा VIDEO

बसल्या बसल्याच चोराला पकडून दिलं; फिल्ममधील नव्हे तर रिअल लाइफ हिरोचा VIDEO

चोरीची ही संपूर्ण घटना मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

    बँकॉक, 17 सप्टेंबर : एखादा चोर (Robber) पळतो, त्याला पकडण्यासाठी त्याच्यामागून काही लोक पळतात आणि मध्येच हिरोची एंट्री होतो, तो एका फटक्याच चोराला (Robbery)  पकडतो. बऱ्याच फिल्ममध्ये आपण असे फिल्म पाहिले असतील. पण फिल्मी हिरोप्रमाणे चोराला (Robbery video) पकडणाऱ्या एका रिअल हिरोचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. थायलँडमधील चोरीचा (Thailand Robbery) व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीने अगदी बसल्या बसल्याच चोराला पकडून दिलं आहे. चोर पळत असताना या व्यक्तीने खुर्चीत बसून असं काही केलं की चोराचा चोरी करून पळण्याचा प्रयत्न फसला आणि तो पकडला गेला. व्हिडीओत पाहू शकता, एक तरुणी म़ॉलमधील एका दागिन्यांच्या दुकानात जाते. तिने पिवळ्या रंगाचं जॅकेट घातलेलं आहे. डोक्यावर पांढरी टोपी आणि हातात निळे ग्लोव्ह्ज आहेत. तोंडाला मास्क लावलेला आहे. ज्वेलरी शॉपमध्ये जातात ती विक्रेत्यांसमोर एक कागद ठेवते. त्यानंतर दुकानातील विक्रेत तिच्यासमोर काही दागिने ठेवतात. त्यानंतर ही तरुणी ते सर्व दागिने आपल्या पिशवीत ठेवते आणि तिथून पळू लागते. हे वाचा - पॅकिंग खोलत गेला खोलत गेला आणि हातात आलं...; सरप्राईझ गिफ्ट पाहून झाला Shocked त्यानंतर दुकानातील विक्रेत आरडाओरडा करत तिचा पाठलाग करतात. त्यामुळे मॉलमधील इतर लोक सतर्क होतात. तिथं मध्येच एक व्यक्ती खुर्चीत बसली आहे, तीसुद्धा ओरडण्याचा आवाज ऐकून सावध होते आणि पळणारी तरुणी तिच्याजवळ पोहोचताच ती आपला एक पाय लांब करते. चोरी करून पळणारी तरुणी पायाला अडकून धाडकन कोसळते. तेव्हा दुसऱ्या बाजूने एक महिला तिला पकडते आणि मग इतर लोकही तिला धावत जाऊन पकडतात.  चोरीची ही संपूर्ण घटना मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हे वाचा - पुन्हा डोकं फिरवायला आली ढिंच्याक पूजा; तिच्या नव्या गाण्याचा VIDEO पाहिलात का? NowThisEspanol ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ थायलँडमधील एका मॉलमधील आहे. चोरी करणाऱ्या या तरुणीकडे शस्त्रही होतं, तिने 12 हजार डॉलर्स म्हणजे जवळपास 8 लाख 82 हजारांचा ऐवज चोरी केल्याचं सांगण्यात आलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Gold robbery, Robbery, Viral, Viral videos

    पुढील बातम्या