Home /News /viral /

अजबच! बाळाचं नाव ऐकूनच सरकारला फुटला घाम; बदलण्याचे दिले आदेश, काय आहे प्रकरण?

अजबच! बाळाचं नाव ऐकूनच सरकारला फुटला घाम; बदलण्याचे दिले आदेश, काय आहे प्रकरण?

file photo

file photo

एका स्वीडिश जोडप्याने आपल्या मुलाचे नाव (Baby Name) जगातील एका मोठ्या राजकारण्याच्या नावावर ठेवले. स्वीडिश सरकारच्या विभागाला याची माहिती होताच, ते इतके घाबरले की त्यांनी ते नाव ठेवण्यास बंदी घातली

    नवी दिल्ली 18 सप्टेंबर : प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी आपल्या एका नाटकात म्हटलं होतं, की - "नावात काय आहे? आपण गुलाबाला इतर कोणत्याही नावाने पुकारले तरी त्याचा सुगंध कधीही कमी होणार नाही. पण स्वीडिश सरकार (Sweden Government) शेक्सपिअरच्या या मताशी सहमत नसल्याचं नुकतंच दिसलं आहे. नुकतंच, एका स्वीडिश जोडप्याने आपल्या मुलाचे नाव (Baby Name) जगातील एका मोठ्या राजकारण्याच्या नावावर ठेवले. स्वीडिश सरकारच्या विभागाला याची माहिती होताच, ते इतके घाबरले की त्यांनी ते नाव ठेवण्यास बंदी घातली आणि जोडप्याला लगेच नाव बदलण्याचे आदेश दिले. प्रेयसीनं सिक्रेट ठिकाणी गोंदवला BF च्या नावाचा टॅटू; पाहताच तरुणानं तोडलं नातं हे प्रकरण स्वीडनच्या लाहोल्म शहरातील आहे. येथील सार्वजनिक प्रसारक, एसआर यांनी याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं, की अलीकडेच एका जोडप्यानं आपल्या बाळाचे नाव रशियाचे अध्यक्ष (Russian President) व्लादिमीर पुतीन (Couple named newborn baby Vladimir Putin) यांच्या नावावर ठेवले. पण सरकारला याची माहिती होताच त्यांनी या जोडप्याला नाव बदलण्यास सांगितले. खरं तर, स्वीडनमध्ये एक नियम आहे की मुलाच्या जन्माच्या 3 महिन्यांच्या आत पालकांनी आपल्या मुलाचे नाव सरकारी विभागाला सांगावे जेणेकरून ते हे नाव मंजूर करू शकतील. स्वीडिश एजन्सी Skatteverket नं बाळाचं नाव पाहताच ते बदल्याचे आदेश दिले. Skatteverket ने नावावर बंदी घालण्याचे कोणतेही कारण दिलेलं नाही. पण स्वीडिश कायद्यानुसार मुलांच्या नावांवरून वाद होऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. तसंच नाव एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीच्या नावावर ठेवू नये असाही नियम आहे. कारण यामुळे स्वीडनचे लोक गोंधळात पडू शकतात. व्लादिमीर पुतीन कोणत्या श्रेणीत येतात हे या जोडप्याला सांगितलं गेलं नाही, परंतु हे नाव वादग्रस्त असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली USB केबल, अवस्था पाहून डॉक्टरही शॉक स्वीडनमध्ये 1982 मध्ये नेमिंग लॉ म्हणजेच नावांसाठीचा कायदा बनवला गेला होता. हा कायदा 2017 साली अपडेट केला गेला. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी सरकारनं फोर्ड, अल्लाह अशा नावांवरही बंदी घातली होती. या बाळाच्या आई -वडिलांना आपल्या मुलाचं नाव रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या नावाप्रमाणेच का ठेवायचं आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Small baby, Viral news

    पुढील बातम्या