जाहिरात
मराठी बातम्या / Viral / समुद्रात उडी घेताच युवकाला चारही बाजूंनी शार्कनं घेरलं अन्....; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

समुद्रात उडी घेताच युवकाला चारही बाजूंनी शार्कनं घेरलं अन्....; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

समुद्रात उडी घेताच युवकाला चारही बाजूंनी शार्कनं घेरलं अन्....; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

समुद्रात उंच लाटा दिसताच एलीला सर्फिंग करण्याची इच्छा झाली. एली समुद्रात होता तर लॉरा बीचवरुन त्याचा व्हिडिओ काढत होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 10 ऑक्टोबर : तुम्ही टीव्हीमध्ये किंवा समुद्री जिवांच्या संग्रहालयात शार्क (Shark) नक्कीच पाहिला असेल. शार्क अत्यंत धोकादायक मासा आहे, जो माणसांवर हल्ला करतो आणि त्यांना खाऊही शकतो. अनेक देशांतून शार्कच्या हल्ल्याच्या (Shark Attack) बातम्या समोर येत राहतात. या घटनांमध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागतात तर अनेकजण गंभीररित्या जखमी होतात. नुकतंच अमेरिकेच्या एका सर्फरलाही (Surfer) शार्कनं चारही बाजूंनी घेरलं, मात्र यातून तो बचावला. या भीतीदायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shark Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. 51 वर्षांनी पोलिसांना सापडलं वृद्धाचं हरवलेलं वॉलेट; उघडताच बसला धक्का अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारा एली मॅक्डोनल्ड्स आणि त्याची होणारी पत्नी लॉरा ईवान्स सर्फिंगचा आनंद घेण्यासाठी लेने ब्रेवर्ड काउंटीच्या बीचवर गेले होते. समुद्रात उंच लाटा दिसताच एलीला सर्फिंग करण्याची इच्छा झाली. एली समुद्रात होता तर लॉरा बीचवरुन त्याचा व्हिडिओ काढत होती.

जाहिरात

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एलीला आपल्या आसपास काही लहान मासे दिसले. तो हे मासे निरखून पाहण्याचा प्रयत्न करत होता, इतक्यात त्याची नजर शेजारीच फिरत असलेल्या शार्कवर पडली. हे पाहून एलीला धक्का बसला. त्यानं आसपास पाहिलं तर शेजारी आणखीही काही शार्क त्याच्या चारही बाजूंनी फिरत होते (Video of Surfer Surrounded by Sharks) . हिला लग्नातही थोडीशी हवीच! दारूड्या नवरीबाईने कशी सेटिंग लावली पाहा VIDEO लॉरानं म्हटलं, मी एलीच्या जवळ शार्क पाहताच घाबरले आणि माझ्या मनात विचार आला की जोरात ओरडून त्याच्याजवळ जावं आणि त्याचा जीव वाचवावा. मात्र, मी स्वतःला शांत केलं आणि असा विचार केला की या स्थितीत काय करायचं, हे एलीला माहिती आहे. मला हेदेखील माहिती होतं, की अशी परिस्थिती एलीसाठी अगदीच खास असेल, त्यामुळे मी त्याचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यास सुरुवात केली. एली लगेचच पोहत समुद्रातून बाहेर आला आणि त्याचा जीव वाचला. मात्र, एलीनं दुसऱ्याच दिवशी पुन्हा सर्फिंग सुरु केली. एलीच्या या व्हिडिओवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात