मुंबई, 09 ऑक्टोबर : बहुतेक लग्नांमध्ये (Wedding video) नवरीला (Bride video) आपले कपडे, दागिने, मेकअप आणि फोटो यांची चिंता असते. किती तरी महिन्यापासून याची ती तयारी करते आणि लग्नाच्या आधीसुद्धा सर्वकाही नीट आहे ना याची खात्री करते. पण सध्या सोशल मीडियावर अशा नवरीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जिला यापैकी कशाचीच चिंता नाही आहे. तिला चिंता आहे ती दारूची (Bride drinking daaru video).
एका दारूड्या नवरीला (Alcoholic bride video) आपल्या लग्नाचा एक दिवसही दारू सोडवेना (Bride drinking alcohol on wedding). लग्नाच्या दिवशीच ती दारू ढोसताना दिसली. अगदी नटूनथटून ती वाईनचा ग्लास हातात घेते आणि घटाघट पिते. त्यानंतर ती दीर्घ श्वास घेते. जणूकाही किती तरी वेळापासून ती दारूसाठी आसुसलेली होती आणि अखेर तिला ती मिळतेच. सर्वकाही जाऊ दे आधी आपण हेच पिऊया असाच अॅटीट्युट तिचा असतो दिसतो. इतकंच नाही तर लग्नाच्या दिवशीसुद्धा आपल्याला दारू कशी मिळेल, याचीही ती सेंटिग करून ठेवते.
हे वाचा - अरे हिला आवरा! लग्नादिवशीच दारू ढोसतेय नवरी; VIDEO VIRAL
व्हिडीओ तुम्ही नवरीचं बोलणं ऐकलं तर ती कुणालातरी सांगते की लग्नाच्या दिवशीसुद्धा मला पाजायची. "लग्नाच्या दिवशी फेरे वगैरे झाल्यानंतर जेव्हा मी बसलेली असेन ना तेव्हा वोडका घेऊन या. मी असा हात करून दाखवेन मग तुम्ही घेऊन या. मॅडम ज्युस घ्या ज्युस म्हणून असं म्हणत तुम्ही मला द्या", असं ही नवरी सांगते आहे.
View this post on Instagram
ट्रेंडिग दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
हे वाचा - लग्नादिवशीही नवरीला आली हुक्काची हुक्की, ऐटीत धूर सोडत बसली; VIDEO VIRAL
दरम्यान ही पहिली दारूडी ब्राईड नाही. तर याआधीसुद्धा अशाच एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जी लिफ्टमध्ये दारू पार्टी करताना दिसली.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता. आपल्या वजनदार ब्रायडल लेहेंग्याच्या (Heavy Bridal Lehenga) वजनामुळे नवरी लिफ्टच्या फ्लोअरवर (Bride On Lift Floor) बसली आहे. तिच्या हातात वाइनचा ग्लास आहे आणि लिफ्टमध्येच ती दारू पार्टी करताना दिसते आहे.विटी वेडिंग इन्स्टाग्राम अकाऊंटवरील हा व्हिडीओ आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Viral, Viral videos, Wedding video