नवी दिल्ली 10 ऑक्टोबर : अनेकदा तुम्ही पोलिसांच्या (Police) हलगर्जीपणाचे किस्से ऐकले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला पोलिसांच्या ईमानदारीचा एक किस्सा सांगणार आहोत. अमेरिकेच्या कंसास पोलिसांनी एका व्यक्तीची 51 वर्षाआधी हरवलेलं पाकीट शोधून काढलं (Police Returned lost wallet After 51 Years). त्यांनी या व्यक्तीचा सध्याचा पत्ता शोधला.
वहिनी घरी येताच दिरानं केलं असं काही की पाहून सगळेच हैराण, VIDEO VIRAL
1970 मध्ये या व्यक्तीचं पाकीट हरवलं होतं. तेव्हापासून 51 वर्ष हे पाकीट पोलिसांना सापडलं नाही. मात्र, 2021 मध्ये हे पाकीट सापडताच पोलिसांनी या व्यक्तीचा पत्ता शोधला. अखेर कंसासच्या लॉरेन्समध्ये हा व्यक्ती सापडला. जेव्हा त्याला हे पाकीट दिलं गेलं तेव्हा सुरुवातीला त्याला ही चोरीची घटना आठवायलाही वेळ लागला.
ग्रेट बेंड पोलिसांच्या विभागानं फेसबुक पोस्टच्या (Facebook Post) माध्यमातून हा किस्सा शेअर केला. पोस्ट करत त्यांनी सांगितलं, की एका नागरिकानं पोलिसांकडे हे वॉलेट दिलं. या पाकीटामध्ये अधिकाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर अनेक वस्तू सापडल्या होत्या. विशेष म्हणजे 1974 मध्येच लायसन्स कालबाह्य झालेलं. यानंतर अधिकाऱ्यांनी पाकिटाच्या मूळ मालकाशी संपर्क साधला. ते आता लॉरेन्स, कॅन्सस येथे राहतात.
प्राण्यांसोबत रात्र घालवण्याची संधी; एका रात्रीसाठी लाखो रुपये खर्च करतायेत लोक
पोलीस हे वॉलेट घेऊन व्यक्तीच्या घरी पोहोचताच त्याला आठवलं की 1970 मध्ये त्यांचं हे पाकीच हरवलं होतं. 51 वर्षाआधी हरवलेलं हे वॉलेट परत मिळाल्याचं पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी हेदेखील सांगितलं की हे पाकीट त्यांनी स्वतःच्या हातानं बनवलेलं होतं. मात्र, हे हरवलं. पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, की अशा घटना रोज समोर येत नाहीत, ज्या आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news