मुंबई, 26 जानेवारी : लग्न म्हटलं की मजामस्ती आलीच. नवरदेवाचे मित्र तर नवरा-नवरीची चेष्टा करतच असतात. पण काही वेळा ही मजामस्ती नको त्या पद्धतीने होते. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात नवरदेवाच्या मित्रांनी त्याच्यासमोरच भरमंडपात नवरीसोबत विचित्र कृत्य केलं.
लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यापैकी हा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. लग्नाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. मजेमजेत नवरदेवाचे मित्र नको तेच करून बसले. नवरदेवासमोर नवरीसोबत त्यांनी जे केलं त्याची अपेक्षा कुणीच केली नव्हती. नवरदेवाच्या मित्राचं ते कृत्य पाहून नवरीलाही लाज वाटली. पण नवरा-नवरी दोघंही काही करू शकले नाहीत. ते फक्त पाहतच राहिले.
हे वाचा - ट्रॅफिकमध्ये अडकली नवरीबाई; मुहूर्ताआधी मंडपात पोहोचण्यासाठी असं काही केलं की VIDEO तुफान VIRAL
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी स्टेजवर उभे आहेत. अचानक नवरदेवाचा एक मित्र स्टेजवर येतो. तो नवरा आणि नवरीच्या मध्येच जाऊन उभा राहतो.नवरीला तो बाजूला ढकलून देतो. नवरी स्टेजच्या एका टोकाला जाते. त्यानंतर नवरदेवासोबत असलेला मित्र आपल्या इतर मित्रांनाही स्टेजवर बोलावून घेतो. सर्वजण लग्न होत असलेल्या आपल्या मित्रासोबत फोटो काढतात.
नवरदेव आपल्या नवरीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो पण तेव्हा त्याचे मित्र त्याचा हात धरून ठेवतात आणि ग्रुप फोटो काढतात. तुम्ही नीट पाहिलं तर बिच्चारी नवरीबाई स्टेजच्या एका कोपऱ्यात राहून सर्वकाही गुपचूप पाहत राहते. ना नवरा ना नवरी काहीच करू शकत नाही.
हे वाचा - अजब लग्नांची गजब कहाणी! कुणी निर्जीव वस्तू तर कुणी खतरनाक प्राण्यांसोबतच थाटला संसार
naughtyworld_ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
View this post on Instagram
तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटतं? लग्नात अशी मस्ती करणं योग्य आहे का? अशावेळी नवरा-नवरीने काय करायला हवं होतं? किंवा एखाद्या लग्नातील असा काही किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Bridegroom, Viral, Viral videos, Wedding