मराठी बातम्या /बातम्या /Viral /78 वर्षीय आजीच्या भन्नाट डान्सचा इंटरनेटवर धुमाकूळ; VIDEO नं जिंकली लाखोंची मनं

78 वर्षीय आजीच्या भन्नाट डान्सचा इंटरनेटवर धुमाकूळ; VIDEO नं जिंकली लाखोंची मनं

या व्हिडिओला बातमी देईपर्यंत 18 मिलियनहून अधिकांनी पाहिलं, तर 65 हजारहून अधिकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

या व्हिडिओला बातमी देईपर्यंत 18 मिलियनहून अधिकांनी पाहिलं, तर 65 हजारहून अधिकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

या व्हिडिओला बातमी देईपर्यंत 18 मिलियनहून अधिकांनी पाहिलं, तर 65 हजारहून अधिकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

नवी दिल्ली 29 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ अतिशय विनोदी तर काही भावुक करणारे (Emotional Video) असतात. काही व्हिडिओ पाहून नेटकरी पोट धरून हसतात, तर काही व्हिडिओ पाहून नकळत डोळ्यात पाणी येतं. अनेकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लोकांचं विशेष टॅलेंटही पाहायला मिळतं आणि या माध्यमातून आपली कला सर्वांना दाखवण्याची संधी या लोकांना मिळते. सध्या अशाच एक आजीबाईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Dance Video of Grandmother) धुमाकूळ घालत आहे.

'शिकवणीसाठी येणाऱ्या मुलींवर बलात्कार करतो पती'; महिलेनं कोर्टात धाव घेत मागितली

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या आजीसोबत डान्स करताना दिसतो. व्हिडिओमध्ये दिसणारी आजी या वयातही ज्याप्रकारे डान्स करत आहे आणि ठुमके लगावत आहे, ते पाहून सगळेच हैराण झाले आहेत. इतकंच नाही तर आजीबाईंच्या चेहऱ्यावरील हावभावही नेटकऱ्यांची मनं जिंकत आहेत. या व्हिडिओला बातमी देईपर्यंत 18 मिलियनहून अधिकांनी पाहिलं, तर 65 हजारहून अधिकांनी कमेंट केल्या आहेत.

" isDesktop="true" id="585662" >

इंटरनेटच्या दुनियेत सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात 78 वर्षीय कृष्णकुमारी तिवारी डान्स करताना दिसत आहेत. कृष्णकुमारी यांना लहानपणापासूनच डान्सची आवड होती. मात्र, कुटुंबीय आणि समाजाच्या भीतीनं त्यांची ही आवड मागे पडली. त्यामुळे, त्यांच्या भावना मनातच राहिल्या. नेपाळची ही महिला आज टिकटॉक स्टार आहे. त्या आज आपले डान्स व्हिडिओ बनवून लोकांचं मनोरंजन करतात. कृष्णकुमारी यांना या गोष्टीचाही आनंद आहे, की अनेक लोकं त्यांचे व्हिडिओ पाहून दिवसरात्र त्यांचं कौतुक करत आहेत.त्यांचं असं म्हणणं आहे, की मला माझा शेवटचा श्वासही डान्स करतच घ्यायचा आहे.

संतापजनक! 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; गुप्तांगावर वार करत मानही मोडली अन्...

कृष्णकुमारी यांनी सांगितलं, की डान्स करण्याची माझी आवड मी नेहमीच दाबून ठेवली. आज माझ्यासोबत काय होत आहे, हे मला माहिती नाही. मात्र, आता प्रत्येत क्षणी फक्त डान्सच करावा, असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की आता मला या कामापासून कोणीही थांबवू शकत नाही. आज माझा आनंद पाहून माझी मुलंही प्रचंड आनंदी आहेत. आजीबाईचा डान्स पाहून अनेकजण त्यांचे फॅन झाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Dance video, Video viral