जयपूर 29 जुलै : एका महिलेनं आपल्या शिक्षक (Teacher) पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पत्नीनं आपल्याच पतीवर ट्यूशनसाठी (Tuition) येणाऱ्या मुलींवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पत्नी कोर्टातही (Court) पोहोचली. पोलिसांनी (Police) सध्या या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमधील आहे.
जयपूरमध्ये एका पत्नीनं कोर्टात धाव घेत आपल्याच पतीविरोधात तक्रार दिली आहे. तिनं म्हटलं, की तिचा पत्नी मुलींना ट्यूशनच्या बहाण्यानं घरी बोलावतो आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतो. मात्र, मी याचा विरोध केल्यास तो मला मारहाण करतो. ही महिला जयपूरच्या मानसरोवर परिसरात राहते. महिलेनं सांगितलं, की माझे पती सरकारी शाळेत शिक्षक असून त्यांचं चारित्र्य अजिबातही चांगलं नाही. ट्यूशनसाठी येणाऱ्या विद्यार्थीनींनी त्याच्यापासून वाचणं गरजेचं आहे.
संतापजनक! 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; गुप्तांगावर वार करत मानही मोडली अन्...
पत्नीनं आपल्या आरोपात असंही म्हटलं, की माझा पती शाळेतील मुलींना घरी बोलावतो, यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करतो. सुरुवातीला मला हे वेगळं वाटलं नाही, मात्र हळूहळू त्याच्या या सवयी माझ्या लक्षात आल्या. तिनं पुढे सांगितलं, की माझ्या पतीच्या या कृत्याला मुली विरोध करत असत मात्र सरकारी शाळेत शिक्षक असल्यानं, विरोध केल्यास परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी तो देत असे.
पुण्यात गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मुलाची दहशत, क्षुल्लक कारणामुळे तरुणाची हत्या
महिलेनं पुढे सांगितलं, की मी पतीचा विरोध केला. घरात आवाज उठवला. मात्र, त्यानं ऐकलं नाही. मलाच शांत केलं. तो हे म्हणाला, की त्या मुलींना काही अडचण नाही तर तुला का आहे? महिलेनं असा आरोप केला, की जेव्हा मी आवाज उठवला तेव्हा पतीनं मला मारहाण केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rape news