कराची 29 जुलै : एका सहा वर्षाच्या मुलीसोबत बलात्कार (Rape) करत यानंतर अमानुष कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घटनेत आधी या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला. यानंतर तिच्या डोक्यावर आणि गुप्तांगावर वार करण्यात आले. इतकंच नाही तर यानंतर चिमुकलीची मान मोडून तिची हत्या (Murder of Minor Girl) करण्यात आली. ही घटना पाकिस्तानच्या (Pakistan) कराची येथे घडली आहे. कराचीच्या कोरंगी भागातून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह पोलिसांनी जवळच्याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आला. या घटनेनंतर लोकांनी पोलिसांविरोधातच (Police) संताप व्यक्त केला आहे.
पुण्यात गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मुलाची दहशत, क्षुल्लक कारणामुळे तरुणाची हत्या
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, ही मुलगी मंगळवारी रात्री कोरंगी येथील घोस पाक परिसरातील आपल्या घरून बेपत्ता झाली होती. मुलीच्या आई-वडीलांनी मध्यरात्री पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पहाटे पाचच्या सुमारास मुलीचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आला. पोलिसांनी वेगवेगळ्या भागांत छापेमारी करून तब्बल 12 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
आधी घरी बोलावलं, मग अपहरण करत बापानंच केली मुलीची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का
पोलिसांनी सांगितलं , की मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तिचा तपास सुरू झाला होता. मात्र, तिच्याबद्दल काही माहिती मिळण्याआधीच मुलीचा मृतदेह आढळून आला. तिची मान तुटलेली होती. शवविच्छेदन अहवालातून हे स्पष्ट झालं की मुलीवर आधी बलात्कार करून मग तिची हत्या करण्यात आली आहे. डॉ. सय्यद यांनी सांगितलं, की मुलीच्या डोक्यावर आणि इतरही नाजूक भागांवर अनेक वार झाल्याचं दिसून आलं आहे. यातून हे स्पष्ट होतं, की हत्येच्या आधी पीडितेला गंभीर यातना दिल्या गेल्या आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder news, Rape news, Rape on minor