मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'इथे येताना स्कर्ट घालू नका'; महिला पर्यटकांना दिला जातोय अजब सल्ला, वाचा कारण

'इथे येताना स्कर्ट घालू नका'; महिला पर्यटकांना दिला जातोय अजब सल्ला, वाचा कारण

समिट वन वेंडरबिल्ट (Summit One Vanderbilt) बिल्डिंग पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. नुकतीच ही बिल्डिंग पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 26 ऑक्टोबर : अनेक धार्मिक स्थळांच्या ड्रेस कोडबद्दल (Dress Code) तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र, एखाद्या पर्यटनस्थळी कपड्यांबाबत नियम असल्याचं कदाचित तुम्ही कधीही ऐकलं नसेल. मात्र, अमेरिकेच्या न्यूयॉर्क (New York) सिटीमध्ये एक असं पर्यटन स्थल आहे, जिथे महिलांना ड्रेस कोडबद्दल सल्ला दिला जातो.

घराच्या दरवाजातून बाहेर आला भलामोठा कोब्रा अन्...; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये समिट वन वेंडरबिल्ट (Summit One Vanderbilt) बिल्डिंग पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. नुकतीच ही बिल्डिंग पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या बिल्डिंगच्या टॉपवरुन पर्यटकांना न्यूयॉर्क सिटीतील अतिशय सुंदर दृश्य दिसतं. मात्र, इथे येण्याआधी महिलांना स्कर्ट घालून न येण्याचा सल्ला दिला जातो.

समिट वन वेंडरबिल्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, स्कर्ट घालून न येण्याचा काही सक्त नियम नाही. मात्र महिला पर्यटकांना हा सल्ला नक्की दिला जातो. याचं कारण हे आहे, की या इमारतीची फ्लोरिंग कलर्ड नसून काचेची आहे. यात रिफलेक्शन अगदी स्पष्ट दिसतं. इमारत उंच असल्यानं याठिकाणी हवादेखील भरपूर असते. अशात कपडे उडूही शकतात. यामुळे हाफ पॅन्ट घालण्याचा सल्ला दिला जातो.

वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळीच मुलीचं विचित्र कृत्य; फोटो पाहून संतापले नेटकरी

समिट वन वेंडरबिल्टची उंची जमिनीपासून 1401 फूट आहे. ग्रँड सेंट्रल स्टेशनच्या शेजारीच असलेल्या या खास टॉवरचं आकर्षण म्हणजे काचेच्या फरश्या आणि भिंती आहेत. इमारतीची उंची भरपूर आहे आणि ही इमारत काचेची आहे.  याच कारणामुळे ती धोकादायक असल्याचंही म्हटलं जातं.

First published:

Tags: Viral news