नवी दिल्ली 26 ऑक्टोबर : सोशल मीडियाच्या (Social Media) दुनियेत कधी काय पाहायला आणि ऐकायला मिळेल हे सांगता येत नाही. इथे अनेकदा मस्ती आणि खळखळून हसवणारे विनोदी व्हिडिओ समोर येतात तर अनेकदा हैराण करणारे व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतात. सध्या एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) झाला आहे. यात एक कोब्रा साप (Video of King Cobra) दरवाजामध्ये बसलेला दिसत आहे.
Shocking Video! खेळता खेळता झालं भांडण, छोट्या भावाने पेनच घुसवलं डोक्यात
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक साप दरवाजातच बसलेला आहे. व्हिडिओ बनवणारा व्यक्ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागताच हा साप हल्ला करतो. क्लिप पाहून जाणवतं की साप अतिशय मोठा आणि विषारी आहे.
This Intrusion Defense System is lit! pic.twitter.com/VyrzSHcnjb
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) October 25, 2021
24 सेकंदाचा हा हैराण कऱणारा व्हिडिओ @DoctorAjayita नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत 16 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर 1000 हून अधिकांनी लाईक केला आहे. याशिवाय लोक या व्हिडिओ निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Shocking! बायको-चिमुकल्यासह 2 बसच्या मध्ये चिरडला बाईकचालक; भयंकर अपघाताचा VIDEO
हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर विनोदी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, क्रिएटीव्ह वे ऑफ वेलकमिंग. दुसऱ्या एका वापरकर्त्यानी लिहिलं, या घरात जाण्याची रिस्क कोणीच घेणार नाही. आणखी एकानं लिहिलं की या घराची घंटी कोणीही लवकर वाजवणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: King cobra, Shocking viral video