मराठी बातम्या /बातम्या /Viral /विमानतळावर हरवलेली सूटकेस चार वर्षांनंतर सापडली, उघडताच महिलेला बसला धक्का

विमानतळावर हरवलेली सूटकेस चार वर्षांनंतर सापडली, उघडताच महिलेला बसला धक्का

(प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Canva)

(प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Canva)

शिकागोहून आलेल्या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात एका महिलेची बॅग हरवली होती. त्यावेळी भरपूर शोधूनही महिलेला आपली बॅग सापडली नाही. पण चार वर्षांनी...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 16 जानेवारी : विमानतळावर सामान गहाळ होणं किंवा हरवणं ही नवीन गोष्ट नाही. अनेकवेळा प्रवाशांचं सामान अशा प्रकारे हरवल्याचं दिसून आलं आहे. भरपूर शोधूनही अनेकदा प्रवाशांना आपलं हे सामान सापडत नाही. अनेकवेळा सामानाची आदलाबदली झाल्याची प्रकरणंही समोर आली आहेत. ही सर्व प्रकरणं सामान्य आहेत. पण अमेरिकेतून जे प्रकरण समोर आलं आहे ते अतिशय अजब आहे. अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये एका महिलेला चार वर्षांनंतर तिची सुटकेस परत मिळाली आहे.

हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीने केला गुन्हा अन् निर्दोष व्यक्ती 17 वर्ष तुरुंगात राहिला, बाहेर येताच नशीब पालटलं

शिकागोहून आलेल्या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात एका महिलेची बॅग हरवली होती. त्यावेळी भरपूर शोधूनही महिलेला आपली बॅग सापडली नाही. एप्रिल गेविनने टिकटॉकवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की, ऑगस्ट 2018 मध्ये ती बिझनेस ट्रिपवरून परतत असताना तिची बॅग हरवली होती. मात्र बऱ्याच काळानंतर म्हणजे 4 वर्षांनंतर तिला आपली ही बॅग परत मिळाली.

गेविनने एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'बॅग होंडुरासमध्ये होती. पण कुठे गेली हे समजलंच नाही. चार वर्षानंतर सुटकेस होंडुरास येथून आली होती आणि टेक्सासमधील ह्यूस्टन येथे होती. त्यांनी मला फोन करून माहिती दिली. गेविन म्हणाली की, सुटकेसचं थोडेसं नुकसान झालं आहे. पण त्यात जे सामान होतं ते अजूनही तसंच आहे.

दारूड्या पतीमुळे उचलले शस्त्र; 24 गुन्हे, 50 हजारांचं बक्षीस; कोण आहे नक्षलवादी रेणुका मुर्मू?

तिने असा दावाही केला की विमान कंपनीने तिला सांगितलं की सूटकेस ट्रॅक केली जाऊ शकली नाही, कारण शिकागोला जाण्यापूर्वी चेक-इन दरम्यान तिचं योग्यरित्या स्कॅन केलं गेलं नव्हतं. याआधी डिसेंबरमध्ये तुर्कीला जाताना एका स्कॉटिश महिलेची बॅग हरवली होती. जी पाच महिन्यानंतर परत मिळाली.

First published:

Tags: Airport, Viral news