जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीने केला गुन्हा अन् निर्दोष व्यक्ती 17 वर्ष तुरुंगात राहिला, बाहेर येताच नशीब पालटलं

हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीने केला गुन्हा अन् निर्दोष व्यक्ती 17 वर्ष तुरुंगात राहिला, बाहेर येताच नशीब पालटलं

हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीने केला गुन्हा अन् निर्दोष व्यक्ती 17 वर्ष तुरुंगात राहिला, बाहेर येताच नशीब पालटलं

या गुन्ह्यातील खरा गुन्हेगार हा या निर्दोष व्यक्तीसारखाच दिसणारा होता. याच कारणामुळे गुन्हेगाराला ओळखण्यात चूक झाली. त्यामुळे निर्दोष व्यक्तीला शिक्षा भोगावी लागली

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 15 जानेवारी : एका माणसाने 17 वर्षे तुरुंगात घालवली. मात्र, तुरुंगा तून बाहेर आल्यानंतर त्याला आठ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. कारण, ज्या गुन्ह्यासाठी त्याला तुरुंगवास भोगावा लागला, तो गुन्हा त्याने केलाच नसल्याचं तपासात निष्पन्न झालं. या गुन्ह्यातील खरा गुन्हेगार हा या निर्दोष व्यक्तीसारखाच दिसणारा होता. याच कारणामुळे गुन्हेगाराला ओळखण्यात चूक झाली. त्यामुळे निर्दोष व्यक्तीला शिक्षा भोगावी लागली. हे प्रकरण अमेरिकेचं आहे. त्या व्यक्तीने तुरुंगातून बाहेर आल्यावर म्हटलं आहे की त्याला त्याच्या नशिबावर विश्वास बसत नाहीये. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 45 वर्षीय रिचर्ड जोन्स याला 2000 मध्ये एका दरोड्याच्या प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आलं होतं. पण हा दरोडा रिचर्डने नाही तर त्याच्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने केला होता हे वर्षानुवर्षे कोणाला समजलंच नाही. त्यामुळे रिचर्डला आयुष्याचा बराच काळ तुरुंगात घालवावा लागला. दारूड्या पतीमुळे उचलले शस्त्र; 24 गुन्हे, 50 हजारांचं बक्षीस; कोण आहे नक्षलवादी रेणुका मुर्मू? जेव्हा पीडित आणि साक्षीदारांना रिचर्डसारख्या दिसणाऱ्या रिकी अमोसचे फोटो दाखवण्यात आले, तेव्हा प्रकरण उघडकीस आलं. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तोपर्यंत निरपराधाने अनेक वर्ष तुरुंगात काढले होते. 1999 मध्ये रिकी अमोसने दरोडा टाकल्याचं सांगण्यात आलं. त्याचा चेहरा रिचर्डसारखा दिसत होता. त्यामुळे खऱ्या गुन्हेगाराला ओळखण्यात पोलिसांची चूक झाली. रिचर्डने सांगितलं की, घटनेच्या वेळी तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत खूप दूर होता, परंतु घटनास्थळावरील पुराव्याअभावी त्याला दोषी ठरवण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींनीही रिचर्डला ओळखण्यात चूक केली आणि त्याला दरोडेखोर मानलं. तुरुंगात गेल्यानंतर रिचर्डने अनेकवेळा अपील केलं, पण हा गुन्हा त्याने केला नसून रिकी अमोसने केला आहे हे सिद्ध करू शकला नाही. दरम्यान, मिडवेस्ट इनोसेन्स प्रोजेक्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅन्सस स्कूल ऑफ लॉ यांनी रिचर्डच्या प्रकरणाची चौकशी केली. त्यांच्या तपासातून, त्यांना असं आढळून आलं की रिचर्डसारखा दिसणारा रिकीदेखील तिथेच कैद होता, ज्या तुरुंगात रिचर्ड आहे. रिकी दुसऱ्या एका प्रकरणात तुरुंगात गेला होता. हे समजल्यानंतर पीडित आणि प्रत्यक्षदर्शींसमोर रिकी आणि आमोस रिचर्ड यांना उभे केले. दोघांचं दिसणं इतकं सारखं होतं की लोक आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारे रिचर्डची सुटका झाली आणि त्याला निर्दोष घोषित करण्यात आलं. 2017 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर रिचर्डला भरपाई म्हणून 8 कोटी रुपये देण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात