मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दारूड्या पतीमुळे उचलले शस्त्र; 24 गुन्हे, 50 हजारांचं बक्षीस; कोण आहे नक्षलवादी रेणुका मुर्मू?

दारूड्या पतीमुळे उचलले शस्त्र; 24 गुन्हे, 50 हजारांचं बक्षीस; कोण आहे नक्षलवादी रेणुका मुर्मू?

जमुई पोलिसांनी नुकतीच सीपीआय माओवादी संघटनेची कमांडर नक्षलवादी रेणुका मुर्मूला अटक केली आहे. झारखंडच्या जसिडीह भागातून तिला अटक करण्यात आली.

जमुई पोलिसांनी नुकतीच सीपीआय माओवादी संघटनेची कमांडर नक्षलवादी रेणुका मुर्मूला अटक केली आहे. झारखंडच्या जसिडीह भागातून तिला अटक करण्यात आली.

जमुई पोलिसांनी नुकतीच सीपीआय माओवादी संघटनेची कमांडर नक्षलवादी रेणुका मुर्मूला अटक केली आहे. झारखंडच्या जसिडीह भागातून तिला अटक करण्यात आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

जमुई, 15 जानेवारी : जमुई पोलिसांनी नुकतीच सीपीआय माओवादी संघटनेची कमांडर नक्षलवादी रेणुका मुर्मूला अटक केली आहे. झारखंडच्या जसिडीह भागातून तिला अटक करण्यात आली. रेणुका मुर्मूवर पोलिसांनी तब्बल पन्नास हजारांचा इनाम ठेवला होता. अखेर या महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. रेणुकावर झारखंडसोबतच बिहारमध्येही अपहरण, खंडणी, हत्या या प्रकरणात दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. कमांडर रेणुका ही सीपीआय या माओवादी संघटनेची झोनल सदस्य आहे. तसेच ती भाकपा माओवादी झोनल कमिटीचे सचिव अनुज उर्फ सहदेव सोरेन याची पत्नी आहे.

रेणुका नक्षलवादी कशी बनली?

मुंगेर जिल्ह्यातील धरहार प्रखंड परिसरातील सराधी गावात राहणारी रेणुका नक्षलवादी कशी बनली याची गोष्ट मोठी रोचक आहे. रेणुकाचं लग्न तीचे माहेर असलेल्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जतकुटिया गांवातील रहिवासी नागेश्वर कोडा याच्यासोबत झालं होतं. मात्र तिच्या पतीला दारूचं व्यसन असल्यामुळे तो तिला मारहाण करत होता. त्रास देत होता. त्यानंतर ती काही दिवसांतच आपल्या पतीपासून वेगळे राहू लागली. परंतु तरीही पतीचा त्रास सुरूच असल्यानं अखेर ती नक्षली चळवळीकडे आकर्षित झाली.

अनेक तरुणांना नक्षलवादी संघटनेसोबत जोडले

पतीला कंटाळून तिने नक्षलवादी संघटनेत प्रवेश केला. तिने आपल्यासोबत अनेक तरुणांना या संघटनेसोबत जोडले. सुरुवातीला तिच्यावर नक्षलवादी संघटनेतील प्रमुख नेत्यांच्या जेवणासाठी स्वयंपाक बनवण्याची जबाबदारी होती. मात्र नंतर तिने हळहळू सर्व शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. यातूनच तिची आणि नक्षली नेता अनुज उर्फ सहदेव सोरेन याच्याशी जवळीक वाढली. तीने त्याच्यासोबत लग्न केलं.

हेही वाचा : एका फोनवर त्याने जळगाव गाठलं; मुलासोबत आरोपीचं भयानक कांड, जिल्हा हादरला

24 पेक्षा अधिक गुन्हे दाखल

रेणुकाचं माहेर आणि सासर असलेल्या जिल्ह्यासह इतर भागात तिच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहारण या प्रकरणात तब्बल 24 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तिला पकडून देणाऱ्याला 50 हजारांचं बक्षिस जाहीर केलं होतं. काही दिवसांपूर्वी मुंगेर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. तेव्हापासून रेणुका ही भूमिगत झाली होती. अखेर तिला झारखंडच्या जसिडीह भागातून पोलिसांनी अटक केली आहे.

First published:

Tags: Jharkhand