जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अचानक दुचाकीस्वारासमोर उभा ठाकला सिंह; पुढे पाहायला मिळालं हैराण करणारं दृश्य, Shocking Video

अचानक दुचाकीस्वारासमोर उभा ठाकला सिंह; पुढे पाहायला मिळालं हैराण करणारं दृश्य, Shocking Video

अचानक दुचाकीस्वारासमोर उभा ठाकला सिंह; पुढे पाहायला मिळालं हैराण करणारं दृश्य, Shocking Video

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक दुचाकीस्वार गावातील कच्च्या रस्त्याने कुठेतरी निघाला आहे. इतक्यात समोरून एक सिंहिण त्याच्याकडे येत असल्याचं त्याला दिसतं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : प्राणिसंग्रहालय किंवा जंगलांमध्ये तुम्ही अनेकदा सिंहाला फिरताना पाहिलं असेल. सिंहाला समोर पाहून फक्त माणूसच नाही तर मोठमोठ्या प्राण्यांनाही घाम फुटतो. सिंहासोबत एखाद्याचा सामना झाला तर त्याचा जीव वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. नशीबवानच सिंहाच्या तावडीतून सुखरूप बाहेर येतात. याच कारणामुळे सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सिंहाला जंगलात राहायलाच आवडतं. मात्र कधीकधी ते जंगलातून बाहेर येत गावांमध्येही शिरतात. काळीज होईल धस्स! टोलेजंग इमारतीच्या बाल्कनीच्या टोकाला उभं राहून व्यायाम सिंहाला मानवी वस्तीत पाहून सहाजिकच सगळ्यांनाच घाम फुटतो. सोशल मीडियावर सिंहाचे नवनवे व्हिडिओ सतत व्हायरल (Viral Videos of Lion) होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Lioness on Road) होत आहे. यात एका दुचाकीस्वाराचा सामना सिंहिणीसोबत होतो. यानंतर हैराण करणारं दृश्य पाहायला मिळतं.

जाहिरात

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक दुचाकीस्वार गावातील कच्च्या रस्त्याने कुठेतरी निघाला आहे. इतक्यात समोरून एक सिंहिण त्याच्याकडे येत असल्याचं त्याला दिसतं. यानंतर हा व्यक्ती मागेच आपली गाडी थांबवतो. हैराण करणारी बाब म्हणजे या व्यक्तीने सिंहाला घाबरून तिथून पळ काढण्याचा अजिबातही प्रयत्न केला नाही. तो आपली दुचाकी घेऊन तिथेच थांबला.

जिवंत कुत्र्यांना मगरीच्या हवाली केलं; क्षणात झाला अंत, संतापजनक VIDEO

सिंहिण या व्यक्तीच्याच दिशेने हळूहळू पुढे येते. हे पाहून त्याच्या काळजाचे ठोके वाढतात. मात्र, काही अंतरावर येताच सिंहिण आपला रस्ता बदलते आणि तिथून निघून जाते. हा व्हिडिओ गुजरातमधील एका गावातील आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा हैराण करणारा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अवघ्या 21 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४५ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर २ हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात