जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जिवंत कुत्र्यांना मगरीच्या हवाली केलं; क्षणात झाला मुक्या जीवाचा अंत, संतापजनक VIDEO

जिवंत कुत्र्यांना मगरीच्या हवाली केलं; क्षणात झाला मुक्या जीवाचा अंत, संतापजनक VIDEO

जिवंत कुत्र्यांना मगरीच्या हवाली केलं; क्षणात झाला मुक्या जीवाचा अंत, संतापजनक VIDEO

व्हिडिओमध्ये (Crocodile Attacked on Dog) एक-दोन कुत्र्यांना पाण्याच्या जवळ नेल्याचं दिसतं. हे दोन्ही कुत्रे इकडे-तिकडे फिरताना आणि मस्ती करताना दिसतात

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 फेब्रुवारी : तुम्ही अनेकदा व्हिडिओमध्ये किंवा मग जंगल सफारीदरम्यान वाघाला किंवा सिंहाला शिकार करताना पाहिलं असेल. हे दृश्य पाहून आपल्याला अनेकदा असं वाटत असेल की निसर्गाचं हे रूप किती निर्दयी आहे. मात्र, अनेकदा आपण हे विसरतो की काही माणसं यापेक्षाही निर्दयी असतात. सध्या अशाच व्यक्तींचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात काही लोक जिवंत कुत्र्यांना मगरीच्या हवाली करताना दिसतात (Man Feed alive Dog to Crocodile). बाथरूममध्ये जाताच महिलेला समोर दिसला विशालकाय कोब्रा अन्.., धडकी भरवणारा VIDEO यूट्यूब चॅनेल पेट्स अँड अॅनिमल्स ट्रेलरवर हा व्हिडिओ मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. व्हिडिओ पाहून समजतं की माणूस किती निर्दयी असू शकतो. व्हिडिओचं कॅप्शन वाचून असं जाणवतं की आसपासचे लोक केवळ व्हिडिओ बनवून व्ह्यूज मिळवण्याच्या उद्देशाने व्हिडिओ काढत आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, मगरीला जिवंत प्राणी खायला देताना.

व्हिडिओमध्ये (Shocking Video) वेगवेगळ्या ठिकाणच्या क्लिप दाखवल्या गेल्या आहेत. व्हिडिओमध्ये (Crocodile Attacked on Dog) एक-दोन कुत्र्यांना पाण्याच्या जवळ नेल्याचं दिसतं. हे दोन्ही कुत्रे इकडे-तिकडे फिरताना आणि मस्ती करताना दिसतात. काही तर पाण्यासोबत खेळूही लागतात. मात्र आपल्याला कोणत्या उद्देशाने इथे आणलं गेलं आहे, याची त्यांना कल्पना नसते. पाण्याच्या आत एक विशालकाय मगर आहे, जी कुत्र्यांना पाहातच त्यांच्याकडे येते आणि अचानक त्यांच्यावर हल्ला करते. हे दृश्य इतकं भीतीदायक आहे की कोणाचाही थरकाप उडेल.

रेल्वेखाली अडकलेल्या मुलीला वाचवायला गेला तरुण;26 डबे अंगावरुन गेले अन्.., Video

हा व्हिडिओ 2 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. या चॅनेलवरील इतर व्हिडिओही प्राण्यांचेच आहेत. यातील बहुतेक व्हिडिओ अतिशय विनोदी आणि क्यूट आहेत. अनेक व्हिडिओमध्ये कुत्रा आणि त्याच्या मालकाची मस्ती आणि खास नातं दाखवलं गेलं आहे. मात्र कुत्रा आणि मगरीचा हा व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे. पाळीव प्राण्याला अशाप्रकारे मृत्यूच्या दारात ढकलणं एखाद्या क्रूर माणसाचंच काम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात