नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी: सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Going Viral) होत असतात. अनेक वेळा लोक व्हिडिओ पाहून मजा घेतात आणि अनेक वेळा काही व्हिडिओ बघून धक्काही बसतो. भारतातील मोठ्या शहरांमध्ये उंच इमारतींचं सोसायटी कल्चर झपाट्यानं पसरलं आहे. काही लोक उंच इमारतीच्या बाल्कनीचा आनंद घेतात, तर काही तिच गोष्ट एक समस्या बनून जाते. असाच काहीसा प्रकार फरीदाबादमध्ये घडला जेव्हा एक व्यक्ती बाल्कनीच्या रेलिंगजवळ (Balcony Railing) जाऊन व्यायाम करू लागला. उंच इमारतीच्या रेलिंगवर कसरत ती व्यक्ती रेलिंगला लटकायला लागली आणि नंतर व्यायाम करताना दिसली. कोणीतरी त्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर आणि इमारतीच्या व्यवस्थापन टीमसोबत शेअर केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण ग्रेटर फरिदाबाद, सेक्टर-82, गेंडुयरा सोसायटीच्या ई-ब्लॉकशी संबंधित आहे, जिथे एक व्यक्ती 12 व्या मजल्यावर बाल्कनीत लटकत होता. आजूबाजूचे लोक त्याला समजावून सांगत आहेत की हे असं काही करू नकोस अन्यथा तुझा जीवही जाऊ शकतो. मात्र नंतर एक मुलगा तिथे येतो आणि त्याला तिथून घेऊन आत जातो. याप्रकरणी सोसायटीच्या व्यवस्थापकाकडून निवेदन याबाबत सोसायटीचे RWA अध्यक्ष दीपक मलिक यांना माहिती मिळताच त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी सांगितले की, व्यक्तीचे वय 56 वर्षे असून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. या व्यक्तीला 28 वर्षांचा मुलगा असून ते भाड्याने राहतात. सोसायटीच्या व्यवस्थापन पथकानं या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्या कुटुंबीयांना समजावून सांगितलं. वृत्तानुसार, पोलिस प्रवक्ते सुबे सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या घटनेची तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.