मुंबई १७ नोव्हेंबर : सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, हे कधी मनोरंजक तर कधी माहिती देणारे, तर काही व्हिडीओ हे धक्कादायक असतात. येथे अनेक तरुण मंडळी प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. काही तरुण मंडळी तर लाईक आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी दर्शवतात. मग यासाठी ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. काही तरुण हे सोशल मीडिया साठी नाही पण मज्जा म्हणून स्टंट करतात आणि असे लोक तुम्हाला रस्त्यावर वेळोवेळी पाहायला मिळतील. हे ही पाहा : टेस्लाच्या ऑटोमॅटिक कारने उडवली सगळ्यांची झोप, धडकी भरवणारा Video व्हायरल हे असे स्टंट कधीकधी या लोकांच्या जीवावर बेततात, तर काही वेळा यांच्या चुकीची शिक्षा इतरांना भोगावी लागते. सध्या याच संबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहाताना तुम्ही श्वास रोखून पाहाल, इतका तो धोकादायक आहे. ही घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की फुटपाथवर काही लोकं आहे. तेव्हा रात्रीच्या अंधारात लांबून भरधाव वेगाने कार येताना दिसत आहे. या कारचा वेग पाहून लोक सैरावैरा पळू लागले आणि आपला जीव वाचवण्यासाठी एका कोपऱ्यात जमले. पण ही भरधाव कार देखील त्या कोपऱ्यापर्यंत आली आणि तितक्यात ती कार तेथून वळली, पण असं असलं तरी या कारने टर्न मारताच तिच्या मागची बाजू जोरदार एका तरुणाला अदळली, ज्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला.
#Trending #TrendingNow #ViralVideos #Video #CCTV @gurgaonpolice arrests 7 for allegedly murdering a man in Udyog vihar while driving drunk and reckless. #accidentefatal #drunk #driving @TrafficGGM #Accidents #Gurgaon #Haryana pic.twitter.com/J5UJyu8o3W
— Sumedha Sharma (@sumedhasharma86) November 7, 2022
नशीबानं त्या कारने तेथून टर्न मारला, नाहीतर तेथे असलेल्या सर्वच लोकांचं काय झालं असतं, हे काही वेगळं सांगायला नको. पण या कारने ज्या तरुणाला धडक दिली, त्याने आपला जीव गमावल्या असल्याची माहिती मिळवली आहे. ही घटना गुरुग्राममधील असल्याचे कळत आहे. ही घटना रविवारी पहाटे दोनच्या सुमारास उद्योग विहार फेज-4 येथे घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ही पाहा : Video: सायकल चालवणाऱ्या चिमुकलीवरुन गेली कार… पुढे जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण क्लिपमध्ये, मद्यधुंद अवस्थेत काही तरुण दुकानाबाहेर मारुती एर्टिगा, ह्युंदाई व्हेन्यू आणि ह्युंदाई क्रेटा वापरून स्टंट करताना दिसतात. अचानक, एका एसयूव्हीचे नियंत्रण सुटले आणि ती समोर येऊन धडकली. या घटनेत एकला जागीच जीव गमवावा लागला, तर इतर दोघे जखमी झाले आहेत. या घटनेत आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली असून दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.