जाहिरात
मराठी बातम्या / Viral / टेस्लाच्या ऑटोमॅटिक कारने उडवली सगळ्यांची झोप, धडकी भरवणारा Video व्हायरल

टेस्लाच्या ऑटोमॅटिक कारने उडवली सगळ्यांची झोप, धडकी भरवणारा Video व्हायरल

धक्कादायक अपघाताचा थरार

धक्कादायक अपघाताचा थरार

खरंतर या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर अशी काही चर्चा उठवली आहे की लोक आता घाबरले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई १७ नोव्हेंबर : टेस्लाच्या ऑटोमॅटिक गाड्या फेल झाल्याच्या अनेक बातम्या तसेच व्हिडीओ देखील समोर आले आहेत. जे पाहून हे मॉडल फेल झालं असं म्हणायला काहीच हरकत नाही. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ चीनमधील आहे. पण याची भीषणता पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. खरंतर या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडिया वर अशी काही चर्चा उठवली आहे की लोक आता घाबरले आहेत. हा व्हिडीओ टेस्ला कारशी संबंध आहे. या कारचं AI काम करणं बंद झालं, ज्यामुळे काही भलतंच घडलं. हे ही पाहा : Viral Video: यमराज सुट्टीवर होता वाटतं? तरुणीसोबत जे घडलं, ते पाहून तुम्ही असंच म्हणाल हा अपघात इतका भीषण होता की यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागते, तर काही लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत. वास्तविक, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना चीनच्या ग्वांगडोंगची आहे आणि ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती. असे सांगण्यात आले की टेस्लाच्या ऑटोमॅटिक वाय मॉडेल कारने जाताना अचानक नियंत्रण गमावले, त्यानंतर कार थांबू शकली नाही. एवढंच काय तर ही कार रस्त्यावरुन एवढ्या जोरात चालू लागली की, कोणाला काही कळायच्या आत ती अनेकांना उडवून पुढे जात होती.

जाहिरात

त्यामुळे अनेक अपघात झाले होते. यात काही वाहनांना जोरदार धडक बसली, तर रस्त्यावरून चालणाऱ्या काही लोकांनाही धडक बसली. अखेर बऱ्याच वेळाने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका इमारतीच्या काठावर आदळली आणि मोठा स्फोट झाला, त्यानंतर ती थांबली, मात्र यादरम्यान या कारने दोन जणांचा बळी घेतला तर सुमारे पाच जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

हा व्हिडीओ ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहाताच लोक देखील खूप घाबरले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात