वॉशिंग्टन, 17 नोव्हेंबर : एखादी व्यक्ती मृत झाली तरी ती पुन्हा जिवंत होणं, असं एखाद्या फिल्ममध्येच आपण पाहत आलो आहोत. प्रत्यक्षात असं शक्य नाही, हे आपल्यालाही माहिती आहे. एखाद्याचा श्वास थांबला, हृदयाची धडधड थांबली म्हणजे त्याचा मृत्यू झाला असंच समजलं जातं. एकदा का एखादी व्यक्ती मृत झाली की ती पुन्हा जिवंत होऊ शकत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अशाच एका मृत व्यक्तीला डॉक्टरांनी चक्क जिवंत करून दाखवलं आहे. अमेरिकेच्या टेक्सासमधील ही चमत्कारिक घटना आहे. जॅकब ब्रेवर नावाचा हा 15 वर्षांचा मुलगा फ्लोरिडाच्या बीचवर आपल्या कुटुंबासोबत गेली होती. तेव्हा वादळ आलं आणि विजा कडकडू लागल्या. या व्यक्तीवरही वीज कोसळली. त्यानंतर त्याचा श्वासही थांबला होता. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचं त्याच्या कुटुंबानेही मानलं. न्यूयॉर्क पोस्ट शी बोलताना जॅकबची आई बारबरा म्हणाली, वादळ येऊ लागलं म्हणून आम्ही आमचं सामान पॅक केलं आणि चालू लागलो. त्यावेळी एक बोल्ट छातीवर पडलं. सुरुवातीला नेमकं काय झालं हे मलालाही समजलं नाही. असं वाटलं की एखादा ब्लास्ट झाला. मला काहीच समजत नव्हतं. हे वाचा - Shocking! मित्रांची मस्ती जीवावर बेतली; खेळाखेळात 17 वर्षांच्या मुलाचा मृत्यू नंतर मी पाहिलं तर त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्याला सीपीआरची गरज आहे, हे मला माहिती नव्हतं पण मला ते करता येत नव्हतं. वादळ खूप भयानक होतं. आम्ही समुद्रकिनाऱ्यावर राहू शकत नव्हतो. जॅकबला तिथून न्यायाचं होतं. आता माझा मुलगा मी गमावते की काय, असंच मला वाटत होतं.
10-15 मिनिटांनी अॅम्ब्युलन्स तिथं आली आणि जॅकबला घेऊन गेली. तेव्हा त्याचा श्वासही बंद झाला होता. तासाभरासाठी त्याचा श्वास थांबला होता. डॉक्टरांनीही त्याला क्लिनिकली डेड मानलं होतं. पण त्यांनी चमत्कार केला. तासाभरातच डॉक्टरांनी त्याला जिवंत केलं. नंतर त्याला वेटिंलेटरवर ठेवण्यात आलं. दोन आठवड्यात आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर टेक्सासच्या फोर्ट वर्थमधील कुक चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं. हे वाचा - आधी तिला चक्कर येते, नंतर घरात कुठेही लागते आग; विचित्र घटनेमुळे कुटुंबासह भयभीत झालं अख्खं गाव त्याची आई म्हणाली, जॅकबला वाचवण्यासाठी कोपर आणि गुडघ्यापर्यंत त्याचे हातपाय कापावे लागले. कारण वीज कोसळल्याने ते खूप गंभीररित्या सूजले होते. त्याची प्रकृती वेगाने ढासळत होती. विजेचा परिणाम म्हणजे त्याच्या पाठीच्या मणक्याच्या हाडाला दुखापत झाली होती. त्याला स्ट्रोकही आला होता. त्याला आपल्या पायांचा वापर करता येतच नव्हता पण मूत्राशयही त्याच्या नियंत्रणात नव्हतं. त्याला पूर्णपणे लकवा मारला होता. 2020 सालातील ही घटना आहे. रिपोर्टनुसार ब्रेवरच्या कुटुंबाने बऱ्याच तज्ज्ञांकडे आपल्या मुलाला दाखवलं. बऱ्याच उपचारानंतर आता तो फक्त जिवंतच नाही तर स्वतः चालतो फिरतो आहे.