मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Shocking! मित्रांची मस्ती जीवावर बेतली; खेळाखेळात 17 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Shocking! मित्रांची मस्ती जीवावर बेतली; खेळाखेळात 17 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मित्रांसोबत मस्ती ठरली जीवघेणी (प्रतीकात्मक फोटो - सौजन्य - Canva)

मित्रांसोबत मस्ती ठरली जीवघेणी (प्रतीकात्मक फोटो - सौजन्य - Canva)

हा मुलगा आपल्या मित्रांसोबत असा खेळ खेळत होता की त्याचा जीवच गेला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

दिल्ली, 17 नोव्हेंबर : काही खेळ असे आहेत जे जितके मजेशीर आहेत तितकेच जीवघेणेही ठरू शकतात. खेळाखेळात मृत्यूही ओढावू शकतो. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका अल्पवयीन मुलाचा खेळताना मृत्यू झाला आहे. आपल्या मित्रांसोबत तो असा खेळ खेळत होता की त्याचा जीवच गेला आहे. ज्या खेळात या मुलाचा जीव गेला, तसा खेळ तुमच्यापैकी काही लोकांनी खेळला असेल किंवा खेळतही असावेत.

दिल्ली एनसीआरमधील गाझियाबादच्या विजय नगरची ही घटना आहे. केशव असं या मृत मुलाचं नाव असल्याचं सांगितलं जातं आहे. केशव आणि त्याचे मित्र असा खेळ खेळत होते की त्याचा जीव गेला. घरापासून काही दूर अंतरावर केशव आपल्या मित्रांसोबत हा खेळ खेळत होता.

खेळ असा होता की एका व्यक्तीवर गोणी टाकली जायची आणि इतर लोक त्याला कानाखाली मारायचे. ज्याच्यावर गोणी टाकण्यात आली त्याने आपल्याला कुणी मारलं ते सांगायचं. जर त्या व्यक्तीने ओळखलं तर ओळखलेल्या त्या मारणाऱ्या व्यक्तीवर गोणी टाकली जायची आणि त्याला मारलं जायचं. हे असंच सुरू होतं. प्रत्येकासोबत केलं जात होतं.

हे वाचा - Shocking! मजेमजेत अशा ठिकाणी लागली आग की कपडे काढूनही विझली नाही शेवटी...; भयानक VIDEO

केशवचा मित्र विशूवर गोणी टाकण्यात आली. तेव्हा विशूला कानशिलात मारताना केशवचा हात चुकून विशूच्या डोळ्यावर लागला. त्यानंतर जेव्हा केशवची वेळ आली तेव्हा विशूने बदला घेण्याचं ठरवलं. त्याने केशवला मारता मारता त्याचा गळा धरला आणि त्याला लाथा मारल्या. त्यानंतर केशव बेशुद्ध झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्याचे मित्रही घाबरले.

रिपोर्टनुसार मृताच्या कुटुंबाने विशूसह तिघांवर हत्या केल्याचा आरोप केला आहे आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता तो माझा मित्र होता, मी त्याला कसं मारणार. आम्ही खेळत होतो. असं विशूने सांगितलं.

क्रिकेट खेळताना वाद, पोटात बुक्की मारल्याने मृत्यू

याआधी मध्य प्रदेशमध्येही  अशीच धक्कादायक घटना घडली होती. क्रिकेटवरून झालेल्या वादात एका 10 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. ब्रिजेश असं या मुलाचं नाव. क्रिकेट खेळत असताना एका लहानश्या गोष्टीवरून मित्रांमध्ये वाद झाला आणि रागात ब्रिजेशच्या मित्रानं त्याच्या पोटात वार केला. पोटात जखम झाल्यामुळे पाच-सहा दिवस ब्रिजेश खातपित नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी ब्रिजेशला अचानक उलट्या सुरू झाल्या.

हे वाचा - आधी तिला चक्कर येते, नंतर घरात कुठेही लागते आग; विचित्र घटनेमुळे कुटुंबासह भयभीत झालं अख्खं गाव

त्याच्या घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र जिल्हा रुग्णालयातच त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

First published:

Tags: Death, Health, Lifestyle