बर्मिघम, 16 फेब्रुवारी : यूरोपमध्ये गेल्या काही दिवसांपासून क्यार चक्रीवादळाने धुमशान घातले आहे. या वादळामुळं संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. एवढेच नाही मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. या वादळाची तीव्रता लक्षात घेता रेल्वे सेवा आणि विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. मात्र यातच एका विमानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बर्मिघम एअरपोर्टवर वादळात अडकलेल्या विमानाचं लॅडिंग करतानाची दृश्य टिपण्यात आली आहेत. भयंकर वादळामुळं चक्क हे विमान रन वेवर उतरून पुन्हा हवेत उडालं, हा थरार विमानतळावरील कॅमेरात कैद झाला आहे. मात्र पायलटच्या हुशारीमुळं या विमानाचा अपघात झाला नाही. वाचा- VIDEO: धावत्या रेल्वेच्या दारात बनवत होता TikTok, हात सुटला अन्… बर्मिघम एअरपोर्टवर वादळात एक विमान टेक ऑफ करत होतं. मात्र, तेवढ्यात जोरदार वारा सुरू झाला आणि विमान काही वेळासाठी हवेतच तरंगत राहिले. एवढेच नाही तर हवेमुळे या विमानाची दिशा सतत बदलत होती. त्यामुळं जीव मुठीत धरून प्रवासी आत बसलेले असताना पालटनं हुशारी दाखवली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे. तसेच, या पायलटचेही कौतुक केले जात आहे. वाचा- खरं की खोटं! चीनमध्ये कोरोना झालेल्यांना गोळी मारून केलं जातंय ठार?
वाचा- कोल्हापुरी माणसाचा गुंडांना हिसका,तरुणाच्या हातातून हिसकावली काठी आणि…VIDEO डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार, हे विमान बेलफास्ट या शहरातून येत होतं. मात्र, क्यार वादळामुळे विमानाला बर्मिंघम एअरपोर्टवर लॅन्ड करावं लागलं. त्यानंतर काही वेळात या विमानाने पुन्हा टेक ऑफ केलं. मात्र, वादळाची तीव्रता वाढल्याने विमानाच्या पायलटने हे विमान पुन्हा लँड केलं. पायलटच्या प्रसंगावधानामुळे या विमानातील सर्व प्रवाशांचा जीव वाचला.

)







