जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : ट्रकला ओव्हरटेक करण्याचा कार चालकाचा प्रयत्न, नियंत्रण सुटलं आणि....

Viral Video : ट्रकला ओव्हरटेक करण्याचा कार चालकाचा प्रयत्न, नियंत्रण सुटलं आणि....

आपघाताचा व्हायरल व्हिडीओ

आपघाताचा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओत भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा धोकादायक पद्धतीने अपघात झाला, हा संपूर्ण अपघाताचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै : सोशल मीडियावर तुम्हाला असंख्य व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायलसा मिळतात. त्यामुळे इथे एकदा का एखादा व्यक्ती आला की त्याचा वेळ कसा जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. इथे कधी मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर कधी एखाद्या थराराक क्षणांचे. सोशल मीडियावर तुम्ही अनेक अपघाताचे व्हिडीओ देखील पाहिले असेल. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ थक्क करणारा. या व्हिडीओत भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा धोकादायक पद्धतीने अपघात झाला, हा संपूर्ण अपघाताचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. आपल्याला रस्त्याने चालताना नेहमी सतर्क राहिले पाहिजे, मग तुम्ही गाडी चालवत असू देत किंवा रस्त्याने चालत असेल, तरी देखील कधी कोणती परिस्थीती समोर येईल हे काही तुम्ही सांगू शकणार नाही. त्यामुळे हा व्हिडीओ सगळ्यांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आला आहे. कटरनं दरवाजा कापून बाहेर काढले मृतदेह; दिल्ली-मेरठ अपघातात नक्की कसा घडला? व्हिडीओ समोर नक्की काय घडलं? या व्हिडीओमध्ये काही गाड्या आहेत. ज्या एका मोठ्या ट्रकच्या मागे रांगेत आहे. ज्यामध्ये एक कार ट्रकच्या मागे धावत असते, या ड्रायव्हरला कसा ही मार्ग काढून या ट्रकच्या पुढे जायचे असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे आणि बऱ्याचदा अनेक कार चालक याच पद्धतीने गाडी चालवतात. पण हे किती धोकादायक ठरु शकतं ते तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. तरुणाचं भलतच धाडस, कॉस्ट्यूम घालून पोहोचला खऱ्या मगरीजवळ छेड काढताच… संपूर्ण प्रकार व्हिडीओत कैद ट्रकच्या मागून जाताना कार चालकाचा कारवरील नियंत्रण सुटतो आणि कार रस्त्याखाली उतरली, ज्यानंतर ती पुन्हा रस्त्यावर येते, परंतू पुन्हा रस्त्याखाली उतरते. ज्यानंतर ती थेट रस्त्याखाली उतरुन एका झाडाला जोरदार आदळते आणि सगळीकडे धुराचे लोट होते.हा अपघात इतका भयानक होता की काही क्षणांसाठी तुमचा श्वासही थांबेल. रस्त्यावर कधीही काहीही होऊ शकते हे काही सेकंदांच्या या व्हिडीओने सिद्ध केले आहे.

जाहिरात

हा व्हिडीओ vee नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो लोकांनी लाईक आणि शेअर देखील केला आहे. या व्हिडीओवर असंख्य कमेंट्स देखील आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात