जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कटरनं दरवाजा कापून बाहेर काढले मृतदेह; दिल्ली-मेरठ अपघातात नक्की कसा घडला? व्हिडीओ समोर

कटरनं दरवाजा कापून बाहेर काढले मृतदेह; दिल्ली-मेरठ अपघातात नक्की कसा घडला? व्हिडीओ समोर

अपघाताचा व्हायरल व्हिडीओ

अपघाताचा व्हायरल व्हिडीओ

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर स्कूल बस चालकाची चूक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै : अपघाताचे थरारक व्हिडीओ तुम्ही नक्कीच सोशल मीडियावर पाहिले असणार. हे व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. हल्लीच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो मंगळवारी सकाळी घडला. हा खूपच भयंकर अपघात होता ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर हा भयंकर अपघात घडला ज्याने संपूर्ण देशाची झोप उडवली. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर स्कूल बस चालकाची चूक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. मेरठ येथील हे कुटुंब TUV 300 कारमधून राजस्थानमधील खातू श्याम येथील मंदिरात दर्शनासाठी जात होते. मात्र गाझियाबादमधील दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला. बस आणि कारचा भीषण अपघात, कटरने कापून काढावे लागले मृतदेह; मन सून्न करणारा VIDEO कुटुंबातील दोन सदस्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एका मुलाचाही समावेश आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. गाझियाबादमधील विजय चौकाजवळ TUV 300 कार आणि स्कूल बसची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि कारमध्ये बसलेल्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 वर्षांच्या मुलासह दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कारचे दरवाजेही उघडत नव्हते. अखेर ते कटरने कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

जाहिरात

या भयंकर अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. कार मेरठकडून येत असताना बस आणि कारची टक्कर झाली. बसमध्ये सीएनजी भरून स्कूल बस चालकाने काही किलोमीटरचा प्रवास वाचवण्यासाठी बस 8 किलोमीटर राँग साइडने चालवली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण चुकीच्या बाजूने दिल्ली-मेरठसारख्या मुख्य आणि वर्दळीच्या एक्स्प्रेस वेवर प्रवेश करत असताना बस चालकाला का थांबवण्यात आले नाही, हा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. एडीसीपी ट्रॅफिक रामानंद कुशवाह यांनी सांगितले की, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी 6-7 च्या दरम्यान झाला. अपघातानंतर स्कूल बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस घटनेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघाताच्या वेळी स्कूल बस रिकामी होती असे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात