लखनऊ, 18 जुलै : सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ समोर येत असतात जे आपलं मनोरंजन करतात. अशातच असे काही व्हिडीओ देखील असतात ज्याला नुसतं पाहून अंगावर काटा उभा राहिल. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो एका अपघाताचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. खरंतर रस्ता पार करताना एका बाईकस्वाराच्या अती घाईमुळे आणि चुकीच्या निर्णयामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आहे. जो हृदय पिळवटून टाकणारा आहे. भूतामुळे रस्त्यावर गाडीला अपघात? व्हिडीओचं रहस्य अखेर समोर मुझफ्फरनगरच्या पुरकाजी आणि उत्तराखंड सीमेवर एका भरधाव कारने महामार्ग ओलांडणाऱ्या स्कूटीस्वाराला जोरदार धडक दिली आणि त्याला हवेत अनेक फूट फेकले. कार अपघातात जखमी झालेल्या 30 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हायवेवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भरधाव वेगाचा हा व्हिडीओ कैद झाला आहे. ही घटना मुझफ्फरनगरमधील पुरकाजी पोलीस स्टेशन हद्दीतील उत्तराखंड सीमेवर असलेल्या भुराहेडी चेकपोस्टवर घडली, जेथे पुरकाजी येथील 30 वर्षीय रहिवासी मुर्सलीन सोमवारी दुपारी आपल्या अॅक्टिव्हा स्कूटीवरून महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या कारन धडक दिली. काळ्या रंगाच्या कारचा वेग इतका होता की मुरसलीनने स्कूटीसह हवेत कित्येक फूट उडी मारली आणि नंतर तो रस्त्यावर पडला. गंभीर जखमी झालेल्या मुर्सलीनला पोलीस चौकीवर उपस्थित असलेल्या पोलिसांनी रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कार आणि त्यात बसलेल्या ३ जणांना ताब्यात घेतलं आहे.
मुझफ्फरनगरच्या पुरकाजी आणि उत्तराखंड सीमेवर एका भरधाव कारने महामार्ग ओलांडणाऱ्या स्कूटीस्वाराला जोरदार धडक दिली#viralvideo #viral #TrendingNow #Accident pic.twitter.com/sgNNjQ9FuD
— News18Lokmat (@News18lokmat) July 18, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील व्यक्ती हरिद्वारला भेट देऊन पानिपत येथील त्यांच्या घरी परतत होते. यादरम्यान महामार्गावर कारचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुर्सलीन यांच्या पश्चात तीन बहिणी, एक भाऊ आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.