मुंबई, 06 जुलै : पाणी हे आपल्यासाठी जीवनदान आहे. पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही. परंतु जीवनावशक पाणी कधी कधी असं रौद्र रुप धारण करतं की ज्यामुळे एखाद्याला आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. यासंबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले आहेत, ज्यामध्ये पुरात तसेच त्सुनामीमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. सध्या पाण्यासाठी संबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून अंगावर काटा उभा राहिला. खरंतर पाण्याच्या ताकदीसमोर कोणाचंच काही चालू शकत नाही. अगदी मोठमोठ्या इमारतींचाही सुगाव लागणे कठीण आहे. असाच हा सोशल मीडियावरील भयानक व्हिडीओ नेटकऱ्यांचे होश उडवत आहे, ज्यामध्ये समुद्राच्या लाटांचे महाकाय रूप अंगावर काटा आणणारा आहे. Viral Video : नदीचा जन्म कधी पाहिलाय? हा अद्भूत व्हिडीओ तुमच्या अंगावर आणेल काटा काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. ज्यामध्ये निसर्गाशी खेळलात काय घडू शकतं याचं जिवंत उदाहरण देत आहे खरंतर एक इमारत समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ बांधली गेली आहे, ज्यामध्ये लोकांना सीफेसिंग घर देण्यासाठी जास्तीसे पैसे देखील आकारले गेले असावेत. परंतु तिच गोष्ट लोकांच्या कशी जिवावर उठू शकते हे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. Viral Video : रेल्वे रुळात अडकला कुत्र्याचा पाय; समोरु आली ट्रेन आणि मग जे घडलं ते… या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समुद्रकिनारी बांधलेल्या इमारतीला समुद्राच्या लाटेचा तडाखा बसतो, पाण्याच्या फोर्समुळे काँक्रीटची बाल्कनी देखील पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळताना दिसत आहे. समुद्राच्या लाटा या इमारतीच्या अगदी तिसऱ्या चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचत आहेत.
Ola arrancando barandas en balcones en el Marisol de Mesa del mar, Tenerife 🏢🌊🌊🌊 #FMACANARIAS pic.twitter.com/4gdWSnDNvq
— Nelson J. Acosta 📸 (@NelsonAcosta80) November 18, 2018
नशीबाने हा प्रकार घडला तेव्हा त्या इमारतीत कोणीही रहात नव्हतं. ज्यामुळे कोणतीही जीवीतहानी घडली नाही. हा व्हिडीओ @NelsonAcosta80 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ स्पेनचा (Tenerife, Spain.) असल्याचं सांगण्यात येत आहे. समुद्रकिनारी ही इमारत बांधताना बिल्डरने काय विचार केला असेल, असा प्रश्न काही नेटकऱ्यांना पडला आहे. शिवाय समुद्राच्या इतक्या जवळ इमारत कशी बांधली जाऊ शकते, अशा कमेंट्समध्ये लोक आश्चर्याने करत आहेत.