मुंबई, 06 जुलै : सोशल मीडियावर प्राण्यांसंबंधी अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी प्राण्यांच्या क्यूट क्षणांचे असतात. तर कधी हे व्हिडीओ थरारक असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याने हजारो लोकांची मनं जिंकली आहे. या व्हायरल व्हिडिओत एका कुत्र्याचा पाय रुळांमध्ये अडकलेला दिसत आहे, कुत्रा त्याचा पाय बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि बाहेर पडण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे. हे पाहून काही लोक त्याच्या मदतीसाठी पुढे येतात. यावेळी रेल्वे रुळावर ट्रेन येताना दिसत आहे. परंतु तरीही काही लोकांनी रुळाजवळ उभं राहून कुत्र्याचा पाय काढण्याचा प्रयत्न केला. कुत्रा चावला म्हणून मुंबईच्या तरुणाने खाल्ले महिलेच्या चेहऱ्याचे मांस, नक्की हा प्रकार आहे तरी काय? व्हायरल व्हिडीओमध्ये एका कुत्र्याचा पाय रुळांमध्ये कसा अडकतो हे दिसत आहे. या दरम्यान, वेदनेने रडणारा कुत्रा मदतीच्या आशेने इकडे तिकडे पाहू लागतो. दरम्यान समोरून भरधाव वेगात एक गाडी येताना दिसत आहे. दुसरीकडे, काही लोक कुत्र्याला वाचवण्यात व्यस्त असतात. तेव्हा लोक आधी कुत्र्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. नंतर एक व्यक्ती रुळामध्ये लोखंडी सळी टाकतो आणि रुळाला लांब करतो, ज्यामुळे अखेर कुत्र्याला पाय बाहेर काढण्यात मदत मिळते आणि तो तेथून लगेचच पळ काढतो.
व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, जर लोकांनी त्या कुत्र्याला वेळीच मदत केली नसती, तर त्याचा नक्कीच जीव गेला असता. Viral Video : नदीचा जन्म कधी पाहिलाय? हा अद्भूत व्हिडीओ तुमच्या अंगावर आणेल काटा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून तो खूप शेअर केला जात आहे. एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला 1 लाख 43 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या कुत्र्याचा जीव वाचवला’, असे व्हिडीओवर लिहिलेले दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे.