मुंबई, 06 जुलै : कधी कधी निसर्गाच्या काही गोष्टी इतक्या अद्भूत पद्धतीने आपल्यासमोर येतात की त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन जातं. तर कधी कधी निसर्गाचं सौदर्य आपल्याला मंत्रमुग्ध करतं. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटत आहे. नद्या, पर्वत, जंगले, हे सर्व आपल्याला जीवनाचे अनेक तत्वज्ञान समजावून सांगतात. पण जर नदीबद्दल म्हणायचं झालं तर ती कसा आकार घेते किंवा ती जेव्हा कोरड्या जागेवर येते तेव्हा तेथील दृश्य कसं दिसतं हे पाहण्यासारखं आहे. हा एक प्रकारे नदीचा जन्मच आहे, जे खरोखरच आश्चर्यकारक आहे. ‘बाटली अशी शिड्यांवरुन खाली टाका आणि…’ बिनकामाच्या व्हिडीओला पाहण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखू शकत नाही भारतीय वन सेवेतील एका अधिकाऱ्याने ट्विटरवर असाच एक थरारक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वन अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर जंगलाचा धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही नदीची निर्मिती पाहू शकता. नदीचे पाणी कसे उंच-सखल जमिनीवर मार्ग काढत जंगलातून जात आहे आणि नदी तिथे आपले साम्राज्य प्रस्थापित करत आहे. हे तुम्ही स्पष्ट पाहू शकता.
This is how rivers are made. Forest is the mother of river. Today morning at 6 AM. Foot patrolling with team. pic.twitter.com/Nfdtqy8dSr
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) June 4, 2023
जंगल ही नदीची जननी आहे, जिच्या कुशीत नदी जन्म घेते आणि फुलते. या जंगलाच्या भूमीवर पसरलेल्या नदीचे पाणी मार्ग काढते आणि पाण्याच्या प्रवाहाला जन्म देते आणि पुढे जाऊन या पाण्याच्या प्रवाहाला नदी म्हणतात. हा व्हिडीओ शेअर करताना परवीन कासवान यांनी कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, सकाळी ६ वाजता त्यांच्या गस्ती पथकाने जंगलात नदी तयार झाल्याचे हे दृश्य पाहिले. व्हिडीओ खरोखरच अप्रतिम आहे आणि त्याचे सातत्याने कौतुक होत आहे. आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे.