Home /News /viral /

वयाच्या 44 व्या वर्षी पती गमावला; मग कॅन्सर अन् डिप्रेशनचाही केला सामना, 53 व्या वर्षी पुन्हा झालं प्रेम अन्...

वयाच्या 44 व्या वर्षी पती गमावला; मग कॅन्सर अन् डिप्रेशनचाही केला सामना, 53 व्या वर्षी पुन्हा झालं प्रेम अन्...

पतीच्या मृत्यूनंतर महिलेनं कॅन्सर आणि डिप्रेशनसारख्या (Derpression) गंभीर समस्यांचा सामना केला. परिस्थिती इतकी वाईट असतानाही त्यांनी कधीच कोणाजवळ तक्रार केली नाही

  नवी दिल्ली 04 मार्च : एका मुलाने सोशल मीडियावर आपल्या आईच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे (Second Marriage of Mother), जो बघता बघता प्रचंड व्हायरल झाला आहे (Viral Wedding Photo). यातील खास गोष्टी म्हणजे मुलाने शेअर केलेला हा फोटो त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाचा आहे. महिला ४४ वर्षाची असताना तिच्या पतीचं निधन झालं होतं आणि मुलगा बाहेर देशात राहात असे. अशात त्याची आई एकटीच राहायची. आयुष्यातील या कठीण काळातून जात असतानाच तिला एका व्यक्तीवर प्रेम झालं आणि वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी लग्न केलं. लेकाला वाचवण्यासाठी चवताळलेल्या बैलासमोर आला बाबा आणि...; धडकी भरवणारा VIDEO मिळालेल्या माहितीनुसार, पतीच्या मृत्यूनंतर महिलेनं कॅन्सर आणि डिप्रेशनसारख्या (Depression) गंभीर समस्यांचा सामना केला. परिस्थिती इतकी वाईट असतानाही त्यांनी कधीच कोणाजवळ तक्रार केली नाही आणि हारही मानली नाही. महिलेचा मुलगा जिमीत गांधी याने लिंक्डइनवर आपल्या आईच्या आयुष्याची ही भावुक करणारी कथा लिहिली. जिमीतच्या आईच्या या कथेला लोकांची चांगलीच पसंती मिळाली आणि बघता बघता ही स्टोरी व्हायरल झाली लिंक्डइन प्रोफाईलनुसार, जिमीत राइफिनिटिव्ह नावाच्या कंपनीत सेल्स अॅण्ड मॅनेजमेंटचं काम बघतो. जिमीतने आपल्या आईची कहाणी सांगताना तिच्यासाठी फायटर आणि वॉरियर अशा शब्दांचा वापर केला आहे. जिमीतने सांगितलं की 2013 साली त्याच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हा त्याच्या आईचं वय 44 वर्ष होतं. यानंतर 6 वर्षांनंतर 2019 मध्ये तिला स्टेज 3 चा ब्रेस्ट कॅन्सरही (Stage 3 Breast Cancer) झाला होता.

  पेट्रोलवाली लव्हस्टोरी! फक्त Petrol साठी नवरीबाई लग्नाच्या बोहल्यावर चढली

  जिमीतने सांगितलं की कॅन्सरसोबत लढत असतानाच आईला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागल झाली होती. यानंतर ती कॅन्सरसोबतच डिप्रेशनचाही सामना करत होती. इतक्या अडचणी येऊनही तिने कधी हार मानली नाही. जिमीतच्या म्हणण्यानुसार, ५२ वर्षाच्या वयात त्याच्या आईला पुन्हा प्रेम झालं आणि आता त्यांनी लग्न केलं आबे. जिमीतने म्हटलं की माझी आई माझ्यासाठी एका फायटरसारखी आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Love story, Viral photo, Wedding

  पुढील बातम्या