जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'पेट्रोलवाली' Love Story! फक्त Petrol साठी नवरीबाई लग्नाच्या बोहल्यावर चढली

'पेट्रोलवाली' Love Story! फक्त Petrol साठी नवरीबाई लग्नाच्या बोहल्यावर चढली

'पेट्रोलवाली' Love Story! फक्त Petrol साठी नवरीबाई लग्नाच्या बोहल्यावर चढली

पेट्रोलसाठी लग्न करणाऱ्या नवरीबाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 मार्च : प्रत्येकाच्या दाम्पत्याच्या लग्नाचा किमान एक तरी किस्सा असतो. मग ते अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज.  सर्वात कॉमन म्हणजे त्यांची पहिली भेट कुठे आणि कशी झाली. जी कोणतंच कपल आपल्या आयुष्यात कधीच विसरत नाही जी त्यांच्या कायम लक्षात राहते. आतापर्यंत विवाहित दाम्पत्याच्या पहिल्या भेटीचे किस्से किंवा लव्ह स्टोरी तुम्ही पाहिल्या असतील, ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. पण सध्या सोशल मीडियावर नवरा-नवरीच्या पहिल्या भेटीचा असा किस्सा व्हायरल होतो आहे, जो कदाचित तुम्ही कधीच ऐकला नसेल (Bride married for petrol). एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लग्नाच्या ड्रेसमध्ये कॅमेऱ्यासमोर बसून ही नवरीबाई नवरदेवाला आपण कसं भेटलो आणि त्याच्यासोबत लग्नासाठी का आणि कसे तयार झालो, याबाबत सांगत आहेत. तिची ही लव्हस्टोरी हटके आणि युनिक आहे. ही प्यारवाली नव्हे तर पेट्रोलवाली लव्ह स्टोरी आहे. आता असं आम्ही का म्हणतोय ते या नवरीबाईचा व्हिडीओ पाहिल्यानंतर ती जे काही सांगते आहे ते ऐकल्यानंतरच तुम्हाला समजेल. हे वाचा -  एका लग्नाची अजब कहाणी; घोडा-कारऐवजी स्ट्रेचरवर लग्नमंडपात पोहोचला नवरदेव कारण… व्हिडीओत नवरीबाई नवरदेवाच्या भेटीबाबत सांगताना म्हणते, पहिल्यांदा त्याने मला विचारलं की तुम्ही कुठे राहता, तेव्हा मी सांगितलं की सदरपूर मेहलौरीजवळ राहते. तो म्हणाला मीसुद्धा त्याच रस्त्यावरून जाणार आहे तर मी तुला गाडीत पिक करू का. मग मी विचार केला की, माझं भाडं वाचतं आहे, पेट्रोल वाचतं आहे मग मी ठिक आहे म्हणाले"

जाहिरात

“त्यानंतर एक दिवस त्याने मला प्रपोज केलं मी त्याला नकार दिला. त्याने इतकं पेट्रोल खर्च केलं होतं की त्याचं नुकसान झालं असतं कारण पेट्रोलचे दर वाढत होते. त्याने मला नंतर सांगितलं की जर तू मला होकार देशील तर ठिक आहे नाहीतर माझ्या पेट्रोलचा खर्च खूप वाढला आहे. त्यामुळे मग मी त्याला होकार दिला, असं नवरीबाई म्हणाले. हे वाचा -  VIDEO - कंबर मोडली, मान लचकली; ‘पुष्पा’च्या ‘श्रीवल्ली’वर नाचून वऱ्हाड्यांचे हाल वेडलॉक टेल्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही युनिक लव्हस्टोरी नेटिझन्सना आवडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात