मराठी बातम्या /बातम्या /Viral /लेकाला वाचवण्यासाठी चवताळलेल्या बैलासमोर आला बाबा आणि...; पुढे जे घडलं ते पाहून धडकी भरेल

लेकाला वाचवण्यासाठी चवताळलेल्या बैलासमोर आला बाबा आणि...; पुढे जे घडलं ते पाहून धडकी भरेल

बैलाने बापलेकावर केलेल्या हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बैलाने बापलेकावर केलेल्या हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बैलाने बापलेकावर केलेल्या हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

वॉशिंग्टन, 03 मार्च : मुलांवरील प्रेम म्हटलं की सहसा आईच्याच प्रेमाचा उल्लेख होतो. पण जरी दाखवत नसले तरी आईइतकंच प्रेम वडीलही आपल्या मुलांवर करतात. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही संकटाला सामोरं जावू शकते, तसेच वडीलही आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात (Father saved son from bull). असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यात एका वडिलांनी आपल्या लेकाला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे (Bull attack on father son).

अमेरिकेच्या टेक्सास येथील बेल्टमधील एका भयंकर घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका चवताळलेल्या बैलाने मुलावर खतरनाक हल्ला केला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी त्याने वडील धावून आले. लेक आणि बैल यांच्यामध्ये ते ढाल बनून उभे राहिले. लेकाला वाचवण्यासाठी चवताळेल्या बैलाचा त्यांनी सामना केला. आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही.

कोडी हुक्स नावाच्या एका इन्स्टाग्राम युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत बैल ज्या मुलावर हल्ला करतो तो मुलगा कोडी हुक्स आहे.

हे वाचा - पुरामुळे झाली ताटातूट! आईसाठी कासावीस झालेल्या लेकीने ओलांडला 'मृत्यूचा पूल'

कोडी सुरुवातीला बैलाच्या पाठीवर बसलेला दिसतो. बैल जसा मैदानात येतो, तसाच तो इतका चवताळतो की मैदानात एंट्री घेताच कोडी त्याच्या पाठीवरून जमिनीवर पडतो. कोडी इतक्या जोरात जमिनीवर आपटतो की त्याला स्वतःहून उठणं सोडा साधी हालचाल करणंही शक्य होत नाही. तो आहे त्या अवस्थेत जिथं आहे तिथं तसाच पडून राहतो.

View this post on Instagram

A post shared by Cody Hooks (@cody__hooks)

चवताळलेल्या बैलाला नियंत्रित करण्यासाठी काही लोक धावून येतात, त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. तो बैल पुन्हा कोडीच्या दिशेने धावत येतो. तो त्याच्यावर हल्ला करणार तोच कोडीचे वडील धावत येतात. बैल त्याच्याजवळ यायच्या आधी ते आपल्या मुलावर आडवे पडतात. कोडी खाली आणि त्याचे वडील त्याच्यावर. ते कोडीला आपल्या कुशीत घट्ट बिलगुन धरतात. बैल जेव्हा येतो तेव्हा तो त्यांच्यावर हल्ला करतो. कोडीचे वडील बैलाचा हा हल्ला स्वतःवर झेलतात. मुलाची ते ढाल होतात.

हे वाचा - VIDEO - कंबर मोडली, मान लचकली; 'पुष्पा'च्या 'श्रीवल्ली'वर नाचून वऱ्हाड्यांचे हाल

त्यानंतर बैल दुसऱ्या दिशेने निघून जातो. सुदैवाने बापलेक दोघांनी गंभीर दुखापत झाली नाही आहे. नेटिझन्सनी या वडिलांना हीरो म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bull attack, Parents and child, Pet animal, Viral, Viral videos