मुंबई 22 सप्टेंबर : बऱ्याचदा आपल्या समोर अशा काही घटना घडतात की, ते पाहून आपलं मन सुन्नं होतं. तसेच सोशल मीडियावर देखील आपल्या यासंबंधीत अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे खरोखरंच अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही हादरुन जाल. खरंतर एका हा व्हिडीओ एका रेल्वे अपघाचा आहे. ज्यामध्ये एका बापासमोरच त्याचा मुलगा ट्रेन खाली जातो. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्हीत हे संपूर्ण दृश्य कैद झालं, ज्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा चालत्या ट्रेनमध्ये चढत असताना त्याचा बॅलेंस जातो, ज्यामुळे तो प्लॅटफॉर्मवरुन ठेत ट्रेनखाली जातो. हे पाहून त्या मुलाचे बाबा आपल्या डोक्याला हाथ लावून अक्षरशः नाचू लागतात. त्यांना असं वाटतं की त्यांना त्यांच्या मुलाला आता गमावलं आहे. या मुलावरुन तब्बल 25 सेकंद गाडी जाते. परंतू या मुलाचं नशीब इतकं चांगलं असतं की, त्याचे प्राण वाचले आहे. हे वाचा : सात मिनिटातच घडला चमत्कार, डॉक्टरने बाळात फुंकले ‘प्राण’; पाहा VIDEO ही घटना बुधवारी सकाळी राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर घडली, येथे एक इंजिनिअर विद्यार्थी आपल्या घरातून गांधीनगरला जात असताना दोसा रेल्वे स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसमध्ये चढत असताना पडला आणि चालत्या ट्रेनच्या खाली गेला. त्यावेळी त्याचे वडील भूपेंद्र आनंद रडू लागले. त्याचवेळी आरपीएफ हवालदार सुभाष चंद्र यांना हे दिसताच त्यांनी समजूतदारपणा दाखवत ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना आवाज देऊन चेन खेचून ती ट्रेन थांबवली.
काही वेळाने ट्रेन थांबल्यावर त्या मुलाला तेथून बाहेर काढण्यात आले. यादरम्यान अंश आनंद पूर्णपणे सुरक्षित होता आणि त्याच्या अंगावर एकही ओरखडा आला नव्हता. या घटनेत अंशचा एकच बूट निघाला होता, परंतू शरीराला कोणत्याही जखमा नव्हत्या. हे वाचा : किंग कोब्राला Kiss, 15 फूट लांब सापाशी खेळू लागला तरुण आणि मग… पाहा VIDEO हा व्हिडीओ पाहून लोकांनी त्यावर भरभरुन कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे. लोकांनी या मुलाच्या नशीबाचं कौतुक केलं आहे, तर अनेकांनी हा कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं आहे.