मराठी बातम्या /बातम्या /Viral /

किंग कोब्राला Kiss, 15 फूट लांब सापाशी खेळू लागला तरुण आणि मग... पाहा VIDEO

किंग कोब्राला Kiss, 15 फूट लांब सापाशी खेळू लागला तरुण आणि मग... पाहा VIDEO

किंग कोब्रा साप हा जगातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे आणि त्याने जर का कोणाला दंश केला, तर मात्र त्याच्या वाचण्याची शक्यता फारच कमी राहाते. पण या तरुणानं याची काहीही पर्वा नव्हती

किंग कोब्रा साप हा जगातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे आणि त्याने जर का कोणाला दंश केला, तर मात्र त्याच्या वाचण्याची शक्यता फारच कमी राहाते. पण या तरुणानं याची काहीही पर्वा नव्हती

किंग कोब्रा साप हा जगातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे आणि त्याने जर का कोणाला दंश केला, तर मात्र त्याच्या वाचण्याची शक्यता फारच कमी राहाते. पण या तरुणानं याची काहीही पर्वा नव्हती

  • Published by:  Devika Shinde
मुंबई 21 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्यासमोर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे फारच मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे थरकाप उडवणारे असतात. तुम्ही इंटरनेटवर वाईल्ड लाफस संबंधीत अनेक व्हिडीओ पाहिले असतील, परंतू सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला धक्काच बसले, हो कारण या तरुणाने असंच काहीतरी केलं आहे, जे करण्याचा विचार आपण स्वप्नात देखील नाही करणार. आपल्या सर्वांना माहित आहे की किंग कोब्रा साप हा जगातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे आणि त्याने जर का कोणाला दंश केला, तर मात्र त्याच्या वाचण्याची शक्यता फारच कमी राहाते. म्हणूनच तो आजूबाजूला दिसला तरी लोक तेथू पळ काढतात. परंतू या व्हिडीओमधील तरुणानं धक्कादायक गोष्ट केली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस 15 फूट लांब किंग कोब्रासोबत खेळताना दिसत आहे. त्या माणसाने किंग कोब्राला फक्त पकडलेच नाही तर त्याच्यावर हल्ला करायलाही प्रवृत्त केले. एवढेच नाही तर त्याने आपल्या जिभेने किंग कोब्राच्या तोंडाला स्पर्श केला. हे वाचा : हा VIDEO पाहिला तर दुचाकीवर बसण्याआधी दहावेळा विचार कराल; यवतमाळमधील थरारक घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती एका लहान माकडासह जंगलात सायकलवरून जात आहे, हा व्यक्ती साप पकडण्यात माहीर असल्याचे दिसत आहे. घनदाट जंगलाच्या आत पोहोचताच त्याने सायकल एका बाजूला उभी केली आणि आत माकडासह चालायला सुरुवात केली. काही अंतर गेल्यावर त्याला एक धोकादायक साप दिसला. मात्र, यावेळी त्याच्यासोबत एक कॅमेरामनही उपस्थित असतो जो त्याच्या या कृत्याचे चित्रीकरण करत असतो. त्याने आपल्या हातांनी त्या किंग कोब्राला पकडले आणि मग त्याच्याशी खेळू लागला. किंग कोब्राची शेपटी पकडल्यानंतर, तो तरुण आपल्या हातांनी त्याला उचलतो आणि त्याच्या तोंडाजवळ देखील जाते. यादरम्यान किंग कोब्रा अनेक वेळा हल्ले करतो, पण त्याला यश येत नाही. एवढेच नाही तर या व्यक्तीने किंग कोब्राला जमिनीवर सोडले आणि त्यावर मात केल्यानंतर सापाला किस करण्याचा प्रयत्न केला. हे वाचा : VIDEO - 'मला पकडा, सोडू नका', स्वतःच ओरडू लागला चोर; जे घडलं ते धडकी भरवणारं त्याने आपल्या जिभेनं  किंग कोब्राच्या तोंडानं स्पर्श केला आणि किस केलं. हा किसिंग व्हिडीओ आता सोशल मीडियावर भलताच ट्रेंड होऊ लागला आहे. हा व्हिडीओ युट्यूबवर dede inoen नावाच्या अकाउंट वरुन शेअर करण्यात आलं आहे. ज्यावर बरेच व्हयूज आणि लाईक मिळाले आहेत.
First published:

Tags: Shocking, Shocking video viral, Top trending, Videos viral

पुढील बातम्या