मुंबई 22 सप्टेंबर : सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ शेअर होत असतात, ते बऱ्याचदा आपल्याला आश्चर्यचकीत करतात. तर काही व्हिडीओवर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. असं म्हणतात की, देव आपल्याला दिसत नाही पण तो आपल्या आजूबाजूला असतो, फक्त तो आपल्याला शोधावा लागतो. या व्हिडीओमध्ये मात्र तुम्हाला देव नक्कीच दिसेल. हा व्हिडीओ आहे एका डॉक्टरनं केलेल्या चमत्काराचा. या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, एका महिलेनं एका नवजात बालकाना आपल्या अगदी जवळ घेतलं आहे आणि ती काहीतरी करत आहे. ज्यानंतर ती त्या बाळाला उलटं करते आणि त्याची पाठ घासू लागते. व्हिडीओत पुढे काही वेळानं हे बाळ हसू लागतं. मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडीओमधील ही महिला एक डॉक्टर आहे. खरंतर बाळाच्या जन्मानंतर ते बाळ काहीही हालचाल करत नव्हतं, ज्यानंतर या महिला डॉक्टरने या नवजात बाळाला जवळ जवळ 7 मिनिटं सलग सीपीआर दिला, ज्याला विज्ञानात ‘माउथ टू माउथ रेस्पिरेशन म्हणतात.’ असं करुन या डॉक्टरने त्या बाळाला श्वास घेण्यासाठी मदत केली. तसेच त्याच्या पाठीला चोळून त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला, अखेर या डॉक्टरच्या या प्रयत्नांना यश आले आणि त्या बाळाचे प्राण वाचले. हे वाचा : आईकडूनच मुलांच्या जीवाशी खेळ, पाहून अंगावर उभा राहिल काटा; VIDEO VIRAL शुद्धीवर आल्यानंतर हे गोंडस बाळ डॉक्टरकडे पाहून हळूच हसू लागले. जे पाहाताना खूपच भावनीक आणि मनाला स्पर्श करणारं आहे.
डॉक्टर सुलेखा चौधरी, पीडियाट्रीसियन, CHC, आगरा।
— SACHIN KAUSHIK (@upcopsachin) September 21, 2022
बच्ची का जन्म हुआ लेकिन शरीर में कोई हलचल नहीं थी।
बच्ची को पहले ऑक्सिजन सपोर्ट दिया, लेकिन जब उससे भी लाभ नहीं हुआ तो लगभग 7 मिनट तक ‘माउथ टू माउथ रेस्पिरेशन’ दिया, बच्ची में साँस आ गई।👏🏼❤️#Salute #Doctor #respect pic.twitter.com/1PQK8aiJXQ
या नवजात बाळाचे प्राण वाचवलेल्या या महिलेचं नाव सुरेखा चौधरी आहे. त्या पीडियाट्रीसियन, CHC आहेत. ही घटना मार्च 2022 ची आहे. जी एत्मादपुर, आगरा येथे घडली. याघटनेचा व्हिडीओ मात्र आता जोर धरु लागला आहे. हे वाचा : चमत्कार! ढिगाऱ्याखाली 30 तासांनंतरही जिवंत राहिलं बाळ, पाहा व्हिडीओ या व्हिडीओला ट्विटरवर SACHIN KAUSHIK यांनी शेअर केलं, ज्यानंतर यावर लोकांनी जोरदार कमेंट केल्या. व्हिडीओ शेअर करताना SACHIN KAUSHIK यांनी या महिला डॉक्टरांचं नाव सुलेखा चौधरी लिहिलं, ज्यानंतर त्यांनी पुढे ट्वीट करुन या डॉक्टरचं नाव सुरेखा चौधरी असल्याचं सांगितलं. या व्हिडीओला लोकांकडून जोरदर कमेंट्स येत आहेत. लोक या महिला डॉक्टरचं कौतुक करताना थकत नाहीत. एका युजरनं कमेंट करताना लिहिलं की, ‘‘आम्ही देवाला पाहिले नाही, परंतु तुम्ही त्याच्यापेक्षा कमी देखील नाही आहात. खूप छान मॅडम, तुमचं कामाप्रती किती प्रेम आहे, हे इथून स्पष्ट होतंय. तुमच्या आयुष्यासाठी आम्ही प्राथना करतो.’’