नवी दिल्ली 24 सप्टेंबर : माणसाला अनेकदा अशा अडचणींचा सामना करावा लागतो, ज्या कोणालाही आतूनच तोडत जातात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी येतच असतात. मात्र, हे महत्त्वाचं ठरतं, की यातून बाहेर पडत तुम्ही कशाप्रकारे स्वतःचं आयुष्य जगता. सध्या सोशल मीडियावर एक अतिशय भावनिक व्हिडिओ व्हायरल (Emotional Video Viral on Social Media) झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, की बाप-लेकाच्या नात्यापेक्षा (Relation of Father and Son) सुंदर नातं आणखी कोणतंच नाही. महिलेचे केस कापताना केलेली चूक सलूनला भोवली; द्यावी लागली 2 कोटीची नुकसान भरपाई आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या मुलाला अडचणीत किंवा दुःखात बघताच प्रत्येक बाप हाच विचार करतो की याला यातून बाहेर काढून याचं दुःख कसं कमी करता येईल. प्रत्येक वडील वाईट काळात आपल्या मुलाची साथ देत त्याला आधार देण्याचं काम करत असतात. मात्र, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील मुलगा यामुळे चर्चेत आला आहे, कारण तो कॅन्सरचा (Cancer Patient) सामना करणाऱ्या आपल्या वडिलांचा आधार बनला आहे. सध्या त्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील वडिलांना कॅन्सर होता, मात्र मुलानं आपल्या वडिलांसाठी जे केलं ते भावुक करणारं होतं.
NO ONE FIGHTS ALONE
— GoodNewsCorrespondent (@GoodNewsCorres1) September 20, 2021
This son in Brazil surprises his father who has cancer by shaving off his head in solidarity. ❤😭
"Thank you for being such a wonderful daddy. As they say, 'like father like son.' Now we're equal...2 handsome guys."
(🎥:aalexsaander)pic.twitter.com/IXzwy16gCC
सोशल मीडियावर हा व्हिडिओ GoodNewsCorrespondent या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे, कोणीही एकटं लढत नाही. या मुलानं स्वतः टक्कल करत आपल्या कर्करोगग्रस्त वडिलांना आश्चर्याचा धक्का दिला. मुलानं म्हटलं, ‘इतके चांगले वडील होण्यासाठी धन्यवाद. . जसं म्हटलं जातं तसंच, बाप तसा मुलगा. आता आपण सारखेच आहोत…2 सुंदर लोक’ कपड्यांमुळे तरुणीची भलतीच फजिती; व्हिडिओ पाहताच मदतीसाठी ऑफिस सोडून पळत आला BF या व्हिडिओमध्ये दिसतं, की मुलगा आधी आपल्या वडिलांचे केस कापतो. याच दरम्यान अचानक तो स्वतःचेही केस कापू लागतो. हे पाहून आधी त्याचे वडील हैराण होतात. मात्र, नंतर हे दोघंही भावुक होतात आणि रडू लागतात.