गुवाहाटी 02 जून : देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनानं (Coronavirus) थैमान घातलं आहे. या काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र, याच डॉक्टरांसोबत (Doctors) अनेकजण चुकीच्या पद्धतीनं वागत असल्याचं समोर येत आहे. नुकतंच असंच आणखी प्रकरण समोर आलं. या प्रकरणात कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर काही लोकांनी डॉक्टरलाच मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) झाला असून अनेकांना संताप व्यक्त केला आहे. घटना आसामसच्या होजईमधील आहे. भरमंडपात वधूच्या पायावर नतमस्तक झाला नवरदेव; काय आहे या VIRAL PHOTO मागील खरी कह काही लोकांनी डॉक्टर सेजू यांना घरातून ओढत बाहेर आणलं आणि त्यांना जबर मारहाण केली. यानंतर गंभीर अवस्थेतील या डॉक्टरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या लोकांनी रुग्णाचा जीव वाचवण्यात अपयशी ठरल्यानं डॉक्टरला मारहाण केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली आहे.
Such barbaric attacks on our frontline workers won't be tolerated by our administration. @gpsinghassam @assampolice Ensure that the culprits brought to justice. https://t.co/HwQfbWwYmn
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) June 1, 2021
6 वर्षीय चिमुकलीच्या व्हिडिओची शिक्षण विभागानं घेतली दखल, क्लासेसचा वेळ बदलला मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी या घटनेचा व्हिडिओ रिट्विट केला आहे. यात काही लोक डॉक्टरला जमीनीवर पाडून जबर मारहाण करताना दिसत आहेत. कोणीही या डॉक्टरच्या बचावासाठी पुढे आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी लिहिलं, की आपल्या फ्रंटलाइन वर्कर्सवर होणारे हे गंभीर हल्ले प्रशासन सहन करणार नाही. त्यांनी याबाबत आसामसचे स्पेशल डीजीपी जी पी सिंह आणि आसाम पोलिसांना निर्देश देत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.