मुंबई, 02 जून : आतापर्यंत पती परमेश्वर म्हणून बायको आपल्या नवऱ्याचे पाया पडत आली. पण पहिल्यांदाच एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या पाया पडल्या आहेत. भरमंडपात नवरदेवाने नववधूच्या पाया पडल्या आहेत. वधूच्या चरणी नतमस्तक झालेल्या या नवरदेवाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नाचे तसे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर असतात तर काही आपलं मन जिंकणारे असाच हा हृदयस्पर्शी फोटो आहे. वधूच्या पाया पडणाऱ्या नवरदेवाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. पण नवरदेवाचं कौतुकही वाटेल. विशेष म्हणजे या फोटोमागील खरी स्टोरी समजली तर तुम्हाला या नवरदेवाचं फक्त कौतुक नाही तर त्याचा अभिमान वाटेल.
वरमाला का कार्यक्रम पूरा हुआ तो दूल्हे ने दुल्हन के कदमों में अपना सर झुका दिया तो शादी समारोह में उपस्थित समस्त घराती और बाराती स्तब्ध रह गये।
— Dr. Ajit Varwandkar (@Varwandkar) May 29, 2021
दूल्हे ने जवाब दिया:
1. मेरी वंश को यही आगे बढ़ाएगी
2. मेरे घर की लक्ष्मी कह लाएगी
(1/4) pic.twitter.com/vy2CkuszLO
डॉ. अजित वरवांडकर यांनी हा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करत म्हटलं आहे, वधू-वराने एकमेकांना वरमाला घातल्यानंतर नवऱ्याने आपलं डोकं वधूच्या पायावर टेकवलं. लग्नातील उपस्थित कुटुंबं, नातेवाईक आणि वऱ्हाडी हे पाहून स्तब्धच झाले. हे वाचा - बुमराह आणि संजनाचे हनीमून PHOTOS झाले व्हायरल पुढे नवऱ्याने असं का केलं, याचं उत्तर त्यानं दिलं. तेसुद्धा या पोस्टमध्ये डॉ. अजित यांनी सांगितलं आहे. ही माझा वंश पुढे चालवणार आहे. माझ्या घरात लक्ष्मी आणणार आहे. माझ्या आई-वडिलांचा सन्मान करणार आहे, त्यांची सेवा करणार आहे. मला वडिल होण्याचा आनंद देणार आहे. प्रसूतीवेळी माझ्या मुलासाठी मृत्यूच्या दारात जाऊन येणार आहे. तिच्यामुळे माझ्या घराचा पाया आहे. तिच्यामुळेच समाजात माझी ओळख असेल. आपल्या आई-वडिलांना सोडून ही माझ्यासाठी माझ्या मागे आली. आपल्या माणसांसोबत नातं तोडून तिनं माझ्याशी नातं जोडलं. जर ती इतकं सर्वकाही करू शकते, मग आपण तिला थोडासा सन्मान नाही देऊ शकत का? जर या महिलांच्या चरणी आपलं शीर झुकवणं हास्यास्पद आहे तर मला जगाची पर्वा नाही, असं या नवरदेवानं सांगितलं. हे वाचा - प्रेग्नन्सीत आईने दिला कोरोनाशी लढा; जन्मानंतर काही तासांत बाळाला MIS-C चा विळखा ही पोस्ट पाहून, त्यातील फोटो पाहून आणि नंतर या फोटोमागील खरी स्टोरी समजताच त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. या फोटोनं नेटिझन्सचं मन जिंकलं आहे.