मराठी बातम्या /बातम्या /Viral /तलावात बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाला जवानानं वाचवलं, पाण्यातून बाहेर काढतानाचा VIDEO VIRAL

तलावात बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाला जवानानं वाचवलं, पाण्यातून बाहेर काढतानाचा VIDEO VIRAL

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हरणाच्या पाडसाला (Baby Deer) रेस्क्यू करताना दिसत आहे. हरणाच्या पाडसाला वाचवणारा हा व्यक्ती सैनिक आहे.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हरणाच्या पाडसाला (Baby Deer) रेस्क्यू करताना दिसत आहे. हरणाच्या पाडसाला वाचवणारा हा व्यक्ती सैनिक आहे.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हरणाच्या पाडसाला (Baby Deer) रेस्क्यू करताना दिसत आहे. हरणाच्या पाडसाला वाचवणारा हा व्यक्ती सैनिक आहे.

नवी दिल्ली 13 जून: इंटरनेट जनावरांच्या रेस्क्यूचे व्हिडिओ आजकाल चांगलेच व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral on Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हरणाच्या पाडसाला (Baby Deer) रेस्क्यू करताना दिसत आहे. हरणाच्या पाडसाला वाचवणारा हा व्यक्ती सैनिक आहे. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर लोकांनी याला भरपूर पसंती दर्शवली आहे. या हरणाला वाचवून सैनिकानं जगभरात लोकांचं मन जिंकलं आहे.

बापरे! इंग्रजीतील सर्वात लांब शब्द माहितीये का? वाचायलाच लागतात तब्बल 4 तास

हा व्हिडिओ 11 जून रोजी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हा आतापर्यंत 44 हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ Buitengebieden नावाच्या युजरनं अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये एक तलाव दिसत आहे. तलावाच्या मध्यभागी एका झाडाचं खोड आहे, ज्यावरुन एक लहान हरण घसरुन त्या तळ्यात पडतं. मात्र, इतक्यात एक सैनिक तिथे पोहोचतो आणि या हरणाला पाण्यातून बाहेर काढतो.

रस्त्यावर बसलेल्या गर्भवती गायीवर चढवला ट्रॅक्टर; धक्कादायक VIDEO पाहून हादराल!

हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रत्येकजण या सैनिकाचं कौतुक करत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने लिहिले की, 'मीदेखील एक सैनिक आहे.' तर दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले आहे, की मला खात्री आहे की व्हिडिओमध्ये दिसलेल्या या सैनिकानं मानवांसाठीही असंच केलं असतं. मात्र, काही लोक असेही आहेत, जे याकडे शंकेच्या नजरेनं पाहात आहेत. एका युजरनं लिहिलं, मी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या सैनिकानं हरणाला जमिनीवर ठेवलेलं व्हिडिओमध्ये दिसलं नाही. हा व्यक्ती त्याला शिजवून खाण्याच्या मूडमध्ये तर नाही ना? असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. Buitengebieden नावाच्या ट्विटर हँडलवरुन गेल्या काही दिवसांपासून अनेक प्राण्यांचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

First published:
top videos

    Tags: Deer, Rescue operation, Videos viral