Home /News /viral /

बापरे! इंग्रजीतील सर्वात लांब शब्द माहितीये का? वाचायलाच लागतात तब्बल 4 तास

बापरे! इंग्रजीतील सर्वात लांब शब्द माहितीये का? वाचायलाच लागतात तब्बल 4 तास

आतापर्यंत तुम्ही 32 आणि 45 अक्षरांवाले इंग्रजी शब्द नक्कीच वाचले असतील. मात्र, आम्ही जर असं म्हणालो, की एक इंग्रजी शब्द यापेक्षाही मोठा आहे (Longest Word In English), तर? कदाचित तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही.

    नवी दिल्ली 13 जून : इंग्रजी ही भाषा (English Language) बहुतेक ठिकाणी वापरली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र, या भाषेतील काही शब्द असे आहेत, जे बोलताना समोरच्याला आणि बोलणाऱ्या व्यक्तीलाही अक्षरशः घाम फुटतो. मात्र, आपलं ज्ञान वाढवण्यासाठी इंग्रजी भाषेबाबतच्या काही बाबी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे तुमच्या ज्ञानात प्रचंड भर पडण्यास मदत होईल. तर, याच निमित्तानं जाणून घेऊया इंग्रजीतील सर्वात लांब म्हणजेच मोठ्या शब्दाबद्दल. काय आहे CPR उपचार पद्धत? ज्यामुळे पल्स बंद झाल्यानंतरही फुटबॉलपटू राहिला जिवंत तुम्हाला वेगवेगळ्या भाषा (Language) वाचण्याचा आणि लिहिण्याचा छंद असल्यास ही बातमी तुमच्या कामाची आहे. आतापर्यंत तुम्ही 32 आणि 45 अक्षरांवाले इंग्रजी शब्द नक्कीच वाचले असतील. मात्र, आम्ही जर असं म्हणालो, की एक इंग्रजी शब्द यापेक्षाही मोठा आहे (Longest Word In English), तर? कदाचित तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. हा शब्द 100-200 अक्षरांचा नाही तर 1 लाख 89 हजार 819 अक्षरांचा मिळून बनलेला आहे. मुलाखत देताना अभिनेते दाढी का खाजवतात? सुनील ग्रोवरनं सांगितलं थक्क करणारं कारण हा अत्यंत खास असा शब्द वाचण्यासाठी तब्बल साडेतीन तास लागतात. हा शब्द मानवाच्या शरीरात असणाऱ्या टिटिनच्या प्रोटीनचं (Titin Protein) केमिकल नाव आहे. आपल्या शरीरात वीस लाखाहून अधिक प्रोटीन असतात, हे अमिनो अॅसिडपासून (Amino Acid) बनलेले असतात. मानवाच्या शरीरात आढळणारं सर्वात मोठं प्रोटीन टिटिनच आहे. टिटिनमध्ये 26 हजारहून अधिक अमिनो अॅसिड असतात. आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचणं अत्यंत गरजेचं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Word

    पुढील बातम्या