Home /News /viral /

भीषण! रस्त्यावर बसलेल्या गर्भवती गायीवर चढवला ट्रॅक्टर; धक्कादायक VIDEO पाहून हादराल!

भीषण! रस्त्यावर बसलेल्या गर्भवती गायीवर चढवला ट्रॅक्टर; धक्कादायक VIDEO पाहून हादराल!

या नराधमाला कोणीच माफ करू शकत नाही. इतकं दुष्कृत्य या व्यक्तीने केलं आहे.

    बिलासपुर, 13 जून : ज्या देशात गायीला माता समजून पूजा केली जाते, त्याच गाईच्या पोटात 33 कोटी देवी-देवतांचा वास असल्याचं म्हटलं जातं, त्या गाईला अत्यंत क्रुरपणे मारल्याची घटना समोर आली आहे. ही हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना बिलासपुर येथे घडली आहे. दारूच्या नशेत ट्रॅक्टर चालविणाऱ्या एका नराधमाने गाईच्या अंगावर गाडी घातली. या प्रकरणात सरकंडा पोलिसांना आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कारवाई केली जात आहे. सरकंडा टी आय जेपी गुप्ता यांनी न्यूज18 ला सांगितलं की, सरकंडा भागात एका रस्त्यावर बसलेली गर्भवती गाईवर ट्रॅक्टर चालकाने अत्यंत क्रुरपणे तिच्या अंगावरुन ट्रॅक्टरने चिरडलं. पहिल्यांदा ट्रॅक्टर चढल्यामुळे गाय मरण पावली नाही. मात्र ट्रॅक्टर चालकाने पुन्हा गायीवर ट्रॅक्टर चालवला. जवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही सर्व घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे ट्रॅक्टरच्या मालकाचा शोध लावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या काही तासांनंतरच पोलिसांना ट्रॅक्टरच्या मालकाला अटक केली. ट्रॅक्टर मालकाचे नाव सोनू यादव असल्याचं सांगितलं जात आहे. तर  ट्रॅक्टर चालकाचे नाव ईश्वर ध्रुव असल्याचं समोर आलं आहे. हे ही वाचा-घोडेस्वारीची हौस पडली महागात, वेगात खांबाला जाऊन धडकला आणि...; पाहा VIDEO पोलिसांनी गाईच्या मारेकर्‍यास अटक केली असून त्याच्याविरोधात पशू वध अधिनियमाअंतर्गत कलम लावण्याबरोबरच आरोपीला आणखी कठोर शिक्षा व्हावी म्हणून आणखी काही कलमं लावण्यात येणार आहे. ही घटना सीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जेव्हा हे सर्व घडत होतं, तेव्हा एक कुत्रा हा प्रसंग पाहून इतका विचलित झाला की तो ट्रॅक्टरच्या दिशेने पळू लागला. जर ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरवरून खाली उतरला असता तर कुत्र्याने त्याच्यावर नक्कीच हल्ला केला असता असं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर चालकाने खूप जास्त दारू प्यायली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Shocking video viral

    पुढील बातम्या