चित्तूर (आंध्र प्रदेश), 4 मे : देशभरात Lockdown3 आजपासून सुरू झाला. या वाढीव टाळेबंदीत काही निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यात महत्त्वाचा निर्णय ठरला मद्याची दुकानं उघडण्यास परवानगीचा. देशभरात दारूच्या दुकानांसमोर रांगा लागल्याचं चित्र समोर येत आहे. सोशल मीडियावर सकाळपासूनच वाईन शॉपबाहेरच्या रांगांचे फोटो शेअर होत होते. दारूसाठीच्या रांगेचा एक VIDEO सगळ्यात जास्त व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून खरंच ही एवढी रांग दारूसाठी असेल यावर विश्वास बसत नाही. Coronavirus चा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही नियम यांनी पाळलेले दिसत नाहीत. रांगेत धक्काबुक्की चाललेली दिसते. अशा पद्धतीने कोरोनापासून बचाव कसा होणार? जीवनावश्यक गोष्टींसाठी नव्हे तर दारू विकत घेण्यासाठी एवढी मोठी रांग लागलेली दिसली. आंध्र प्रदेशातल्या चित्तूरमधलं हे दृश्य दिवसभर सगळ्या सोशल मीडियावर फिरत होतं. एका दारूच्या दुकानासमोर लागलेली ही लांबलचक रांग भारताच्या कोरोना लढ्याबद्दल खूप काही सांगून जाते.
#WATCH Andhra Pradesh: Long queue seen outside a liquor shop in Chittoor; social distancing norms flouted. pic.twitter.com/v9IgIrZGqQ
— ANI (@ANI) May 4, 2020
महाराष्ट्रातही पुणे, नाशिक, कोल्हापुरात दारूसाठी रांगा लागल्याचं दृश्य दिसलं. गेल्या दीड महिन्यापासून दारू विक्री बंद होती. नाशिकमध्ये शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी असलेली दुकानं सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं. ही बातमी कानावर येताच दीड महिन्याची दारूची तहान भागवण्यासाठी लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. वाचा - दारूची तलफ भागवण्यासाठी तोबा गर्दी, 2 तासात असं काही झालं की आता होताय पश्चाताप एकीकडे राज्य सरकारने मद्यविक्रीबाबत असा निर्णय घेतलेला असताना पुणे शहरात मात्र मद्यविक्री परवानगीबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. कारण जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अद्याप कोणतेही आदेश काढलेले नाहीत. मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर काय नियम करण्यात आले? 1) सीलबंद मद्य विक्री करणाऱ्या दुकानांसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नयेत व दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर असणे अनिवार्य राहील. त्याकरिता दुकानासमोर प्रत्येक सहा फूटांवर वर्तुळ आखून घ्यावीत. 2) संबंधित अनुज्ञप्तीधारकाने सर्व नोकरांची/ ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावे व ज्या नोकरास, ग्राहकास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत अशा व्यक्तींना दुकानात प्रवेश देवू नये. 3) दुकान सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतूकीकरण करणे आवश्यक राहील. दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांना पाळणे आवश्यक राहील. 4) संदर्भीय आदेश क्र. 1 मधील परिशिष्ट -1 मधील कामाच्या ठिकाणी पाळण्याची मार्गदर्शक तत्वे किरकोळ विक्रेत्यांना पाळणे आवश्यक राहील. 5) किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये लॉकडाऊनबाबतची मार्गदर्शक तत्वे पाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्याची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्तीधारकाची असेल. 6) वर नमुद किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सीलबंद मद्यविक्रीसाठी सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत कार्यरत राहतील. 7) मुंबई विदेशी मद्य नियम, 1953 च्या नियम 70 (डी) अन्वये विहीत केलेली मद्य बाळगणे/ खरेदी करणे याच्या क्षमतेचा भंग होणार नाही याची संबंधित मद्यविक्रेत्याने आवश्यक काळजी घ्यावी. 8) कोणत्याही परिस्थितीत उघडलेल्या मद्य विक्रीच्या आस्थापनांमध्ये मद्यप्राशन होणार नाही याची दक्षता घ्यावी व अशी बाब आढळल्यास कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात यावी. 9) अशा कोणत्याही दुकानाने या मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास त्यांचे दुकान बंद करून त्यांच्याविरूध्द कारवाई केली जाईल. 10) प्रत्येक सीलबंद किरकोळ मद्यविक्री करणाऱ्या दुकानाच्या प्रवेशव्दारावर दर्शनी भागात पुढीलप्रमाणे फलक लावणे आवश्यक आहे. यामध्ये दुकानाच्या कामकाजाच्या सुधारित वेळा, एकावेळी दुकानासमोर पाचपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत, सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर अनिवार्य, ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल, ज्या ग्राहकास सर्दी, खोकला व तापासारखी लक्षणे आहेत त्यांनी दुकानात येवू नये. दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही, परिसरात थुंकण्यास सक्त मनाई आहे आणि दुकानदाराकडून व ग्राहकाकडून नियमभंग झाल्यास त्यांच्याविरूध्द कायद्यान्वये कारवाई केली जाईल. – अन्य बातम्या आपला देश कोरोनावर नक्की मात करणार, आरोग्य मंत्रलयाकडून दिलासा देणारी बातमी ऋषी कपूर यांच्या अस्थि विसर्जनानंतर नीतू कपूर यांनी शेअर केली भावनिक पोस्ट