Home /News /entertainment /

ऋषी कपूर यांच्या अस्थि विसर्जनानंतर नीतू कपूर यांनी शेअर केली भावनिक पोस्ट, डॉक्टरांचे मानले आभार

ऋषी कपूर यांच्या अस्थि विसर्जनानंतर नीतू कपूर यांनी शेअर केली भावनिक पोस्ट, डॉक्टरांचे मानले आभार

30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान त्यांची पत्नी आणि अभिनेत्री नीतू सिंह कपूर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

  मुंबई, 04 मे : एकेकाळी 'चॉकलेट हिरो' म्हणून बॉलिवूडमध्ये राज्य करणाऱ्या ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे 30 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला. 2018मध्ये पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं. त्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. या त्यांच्या खडतर प्रवासात त्यांच्या सोबत एक व्यक्ती कायम होती, ती म्हणजे त्यांची पत्नी नीतू कपूर. नीतू यांनी आज सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्या रुग्णालयाबाबत लिहिलं आहे, ज्याठिकाणी ऋषी कपूर यांचे उपचार सुरू होते. (हे वाचा-आराध्यानं असे मानले कोरोना योद्ध्यांचे आभार, ऐश्वर्या रायने शेअर केला PHOTO) नीतू यांनी ही पोस्ट शेअर करताना ऋषी यांचा चेहऱ्यावर हास्य असलेला एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये नीतू आणि ऋषी हे बॉलिवूडचे रोमँटिंक कपल दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देताना नीतू यांनी रुग्णालयाचे आभार मानले आहेत
  या फोटोला कॅप्शन देताना नीतू म्हणाल्या आहेत की, 'आमचे कुटुंब सध्या मोठ्या दु:खाच्या प्रसंगातून जात आहे. जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो आणि गेलेल्या एका महिन्याचा विचार करतो त्यावेळी आमच्या मनात एचएन रिलायन्स रुग्णालयाप्रती कृतज्ञतेची भावना असते. डॉ. Tarang Gianchandani यांच्या संपूर्ण टीमने माझ्या नवऱ्याला आपलसं मानून त्यांच्यावर उपचार केले. आम्हाला देखील आपलं मानून त्यांनी सल्ले दिले. त्यामुळे अगदी मनाच्या अंत:करणापासून मी त्या सर्वांचे आभार मानते.' ऋषी यांच्यावर उपचार सुरू असताना नीतू सिंह यांनी कधीच त्यांची साथ सोडली नव्हती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या त्यांच्याबरोबर होत्या. (हे वाचा-'गव्हाच्या पिशवीतून पैसे पाठवणारा मी नव्हे',व्हायरल VIDEO बाबत आमीर खानचा खुलासा) संपादन - जान्हवी भाटकर
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor, Rishi kapoor

  पुढील बातम्या