याला म्हणतात Social Distancing! शेजाऱ्यांसोबत सिनेमा पाहण्यासाठी वापरली भन्नाट आयडिया

याला म्हणतात Social Distancing! शेजाऱ्यांसोबत सिनेमा पाहण्यासाठी वापरली भन्नाट आयडिया

लॉकडाऊनमध्ये सिनेमा पाहायचा मोह आवरला नाही म्हणून बघा या पठ्ठ्याने काय भन्नाट आयडिया काढली.

  • Share this:

डब्लिन, 11 एप्रिल : जगभरात कोरोनाव्हायरस सध्या थैमान घातल आहे. जगभरात तब्बल 16 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळजवळ 69 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. यातच लॉकडाऊन असले तरी सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. कारण सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याची शक्यता वाढेल. याकरिताच लोकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई केली आहे.

लॉकडाऊनमध्ये सिनेमा हॉल, थिएटरही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळं टीव्ही किंवा ऑनलाईन लोकं सध्या सिनेमा पाहण्याची हौस पूर्ण करत आहेत. मात्र एक पठ्ठ्याने शेजाऱ्यांसोबत सिनेमा पाहण्यासाठी एक भन्नाट आयडिया काढली. ती सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे भान राखून. यानं चक्क घराजवळची भिंतीला पडदा केला, आणि प्रोजेक्टरनं सिनेमा लावला. थिएटर किंवा सिनेमा हॉल येण्याआधी लोकं अशीच पडद्यावर सिनेमा पाहायची. अशीच काहीशी कल्पना यानं काढली. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वाचा-लॉकडाऊनमध्ये गच्चीवर रंगला जुगाराचा डाव, पोलिसांचा ड्रोन आला आणि...

वाचा-'मौत सें आंख मिलाने की जरूरत क्या है?' हा VIDEO एकदा पाहाच

आयर्लंडमध्ये राहणारी व्यक्ती असून तेथेही लॉकडाऊनमुळे सर्व सेवा बंद आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळत सध्या लोकं आपला वेळ घालवत आहेत. आयर्लंडमध्येही कोरोनाचा प्रसार होत आहे. येथे 6, हजार 574 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 263 लोकांचा मृत्यूही झाला आहे. आयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. सध्या युरोप आणि अमेरिकेत कोरोनाचा जास्त प्रसार पाहायला मिळत आहे.

वाचा-बोटीवर कोरोनाग्रस्त आहे समजताच थेट समुद्रात मारल्या उड्या, VIDEO VIRAL

First published: April 11, 2020, 8:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading