VIDEO : या मुर्खांना आवरा! लॉकडाऊनमध्ये गच्चीवर रंगला जुगाराचा डाव, पोलिसांचा ड्रोन आला आणि...

VIDEO : या मुर्खांना आवरा! लॉकडाऊनमध्ये गच्चीवर रंगला जुगाराचा डाव, पोलिसांचा ड्रोन आला आणि...

जुगाराचा डाव रंगला असताना अचानक आला पोलिसांचा आवाज, पाहा बघ काय झाली यांची अवस्था.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 एप्रिल : कोरोनामुळे प्रसार भारतात वेगाने होत आहे. त्यामुळं सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. मात्र कोरोनाची वाढती भीती हा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. ओडिशामध्ये 30 एप्रिलपर्यंत याआधी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. असे असले तरी, लोकं लॉकडाऊन गांभीर्याने पाळताना दिसत नाही आहे. यासाठी आता पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागत आहे.

पंतप्रधान मोदींनी घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन करूनही लोकं घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांना अशा लोकांवर कारवाई करावी लागत आहे. यासाठी घरातून बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांचा खास ड्रोन नजर ठेवत आहे. असाच एक ड्रोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-हे भन्नाट आहे! हेल्मेटनंतर आता 'कोरोना'ची आली कार, PHOTO VIRAL

@saddam600♬ original sound - Aasif pathan

वाचा-लव इन कोरोना: लॉकडाऊनमध्ये प्रेमी जोडपं घरातून पळालं, पुढे काय झालं तुम्हीच वाचा

या व्हिडीओमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत काही लोकं जुगार खेळत होते. अचानक पोलिसांचा ड्रोन आला आणि लोकांची पळापळ सुरू झाली.

वाचा-अरे देवा! दुसऱ्या बायकोची आली म्हणून लॉकडाऊनमध्ये पोलिसांना केला कॉल आणि...

टिकटॉकवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात लोकं गच्चीवर पत्ते खेळताना दिसत आहेत. छतावर गर्दी करुन लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडा शिकवण्याचा अनोखा मार्ग पोलिसांनी शोधला आहे. ड्रोन कॅमेरानं व्हिडीओ शूट करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

वाचा-VIDEO : सावधान! ग्लोव्ह्जमुळेही पसरू शकतो कोरोना, नर्सनं सांगितलं कारण

लॉकडाऊनमध्ये नियम कठोर असतानाही लोक मात्र मनमानी करताना दिसत आहेत. त्यामुळं कलम 144च्या उल्लंघन करणाऱ्यांवर सध्या कारवाई केली जात आहे. दरम्यान 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अद्याप याबबात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

First published: April 10, 2020, 2:42 PM IST

ताज्या बातम्या