• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Amazon वरुन युवकानं ऑर्डर केला पासपोर्ट कव्हर; डिलिव्हर झालेली वस्तू पाहून बसला धक्का

Amazon वरुन युवकानं ऑर्डर केला पासपोर्ट कव्हर; डिलिव्हर झालेली वस्तू पाहून बसला धक्का

या व्यक्तीनं 30 ऑक्टोबरला अमेझॉनवरुन पासपोर्ट कव्हर ऑर्डर केला. 1 नोव्हेंबरला ही ऑर्डर त्याच्याकडे पोहोचली

 • Share this:
  नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तीनं ऑनलाईन काहीतरी वेगळीच वस्तू ऑर्डर (Online Order) केली. मात्र, प्रत्यक्षात वेगळीच वस्तू या व्यक्तीपर्यंत पोहोचली. अनेकदा महागडं तर अनेकदा स्वस्त सामान यात मिळतं. काही लोक याबद्दल तक्रार करतात, तर काही लोक महागडी वस्तू आल्यास गुपचूप ती ठेवून घेतात. मात्र, या घटनांमध्ये बहुतेक प्रकरणं अशीच पाहायला मिळतात, ज्यात महागड्या वस्तूंच्या जागी अतिशय खराब वस्तू मिळतात. मात्र, सध्या एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर नवरीबाईचे जबरदस्त ठुमके; हा Dance Video एकदा बघाच एका अजब घटनेत (Weird Incident) केरळच्या (Kerala) वायनाड जिल्ह्यातील कनियाम्बेट्टाचा रहिवासी असलेल्या बाबू नावाच्या व्यक्तीने पासपोर्टचा कव्हर (Passport Cover) ऑर्डर केला होता. मात्र, याच्या बदल्यात त्याला पासपोर्टच डिलिव्हर झाला. त्यानं अमेझॉनवरुन (Amazon) ही वस्तू ऑर्डर केली होती. या व्यक्तीनं 30 ऑक्टोबरला अमेझॉनवरुन पासपोर्ट कव्हर ऑर्डर केला. 1 नोव्हेंबरला ही ऑर्डर त्याच्याकडे पोहोचली. जेव्हा त्यानं डिलिव्हरी पॅकेट उघडलं तेव्हा त्याला कव्हरसोबत एक पासपोर्टही मिळाला. इतकंच नाही, तर पासपोर्ट त्याचा नसून त्रिशूरच्या कुन्नमकुलम येथे राहणाऱ्या मुहम्मद सलीह नावाच्या एका व्यक्तीचा होता. घटनेची माहिती देण्यासाठी या व्यक्तीनं लगेचच अमेझॉन कस्टमर केअरसोबत संपर्क साधला. मात्र, कस्टमर केअर एग्झिक्यूटीव्हची प्रतिक्रिया आणखीच धक्कादायक होती. त्याने केवळ इतकंच म्हटलं, की भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही आणि हा कव्हर विकणाऱ्या दुकानदाराला पुढच्या वेळी सावधान राहण्याची सुचना दिली जाईल. 'हिरोपंती' पडली महागात; बाईक स्टंट करतानाच तरुणाचा अपघात, थरकाप उडवणारा VIDEO कस्टमर केअर एग्झिक्यूटिव्हने हेदेखील सांगितलं नाही, की त्याला दिल्या गेलेल्या पासपोर्टचं नेमकं काय करायचं आहे. मात्र मिथून बाबू लवकरच पासपोर्टच्या मालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही पहिली वेळ नाही की ऑनलाईन ऑर्डरमध्ये अशी गडबड झाली आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये केरळच्याच एका व्यक्तीनं iPhone 12 ऑर्डर केला होता. मात्र, त्याला पाच रूपयांच्या ठोकळ्यासोबत एक डिश वॉशिंग बार मिळाला होता.
  Published by:Kiran Pharate
  First published: