जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - विद्यार्थिनीच्या बॅगेतून येत होता विचित्र आवाज; उघडताच शिक्षकांनाही फुटला घाम

VIDEO - विद्यार्थिनीच्या बॅगेतून येत होता विचित्र आवाज; उघडताच शिक्षकांनाही फुटला घाम

शाळेच्या बॅगेत असं काही होतं की शिक्षकही घाबरले.

शाळेच्या बॅगेत असं काही होतं की शिक्षकही घाबरले.

विद्यार्थिनीच्या बॅगेत शिक्षकांना असं काही सापडलं की तेसुद्धा घाबरले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Madhya Pradesh
  • Last Updated :

भोपाळ, 26 सप्टेंबर : सामान्यपणे शाळेच्या बॅगमध्ये काय असतं. वह्या, पुस्तकं, कंपास बॉक्स, टिफिन बॉक्स आणि पाण्याची बाटली. पण एका शालेय विद्यार्थिनीच्या बॅगेत असं काही सापडलं की पाहून शिक्षकांनीही घाम फुटला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटिझन्सनाही धडकी भरली आहे. असं या बॅगेत नेमकं होतं तरी काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आता तुम्हाला लागली असेल नाही का? चला तर नेमकं पाहुयात हे प्रकरण काय आहे. मध्य प्रदेशच्या दतियामधील ही घटना आहे. बडोनी स्कूलमधील एका दहावीच्या विद्यार्थिनीच्या बॅगेतून कसला तरी आवाज येत होता. तिने याबाबत शिक्षकांना सांगितलं. शिक्षक तिची बॅग घेऊन शाळेबाहेर गेले. तिथं त्यांनी तिची बॅग उघडून पाहिली. बॅगेत पुस्तकं, वह्या याच्याशिवाय जे दिसलं ते पाहून त्यांना घाम फुटला. हे वाचा -  Ghost Hunting : महादेवाच्या नगरीत भूताची दहशत; VIDEO VIRAL होताच समोर आलं धक्कादायक सत्य व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती शाळेच्या बॅग हातात घेऊन बसली आहे. हळूच ती बॅगेची चैन उघडते. त्यानंतर आत डोकावून पाहते. ती इतकी घाबरते की बॅगच फेकून देते. बॅग उलटी पडते तेव्हा त्यातील वह्या-पुस्तकं बाहेर पडतात. ती व्यक्ती ती वह्यापुस्तकं आपल्या हातात घेऊन आधी बाजूला करते. त्यानंतर ती बॅग पूर्णपणे रिकामी करते आणि काठीने ती बॅग हलवते, उलटी करते.

जाहिरात

बऱ्याच वेळानंतर त्या रिकाम्या बॅगेतून चक्क एक साप बाहेर पडतो. जसा साप बॅगेतून बाहेर येतो तो फणा काढून राहतो आणि त्यानंतर तिथून पळून जातो. हे वाचा -  महिलेच्या घरातील भिंतीतून बाहेर पडू लागलं रक्त, प्लंबरला बोलावताच समोर आलं धक्कादायक रहस्य @Karan4BJP ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी शिक्षकाच्या हिमतीचं कौतुक केलं आहे, ज्याने विद्यार्थिनीच्या बॅगेतून सापाला बाहेर काढलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात