जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Ghost Hunting : महादेवाच्या नगरीत भूताची दहशत; VIDEO VIRAL होताच समोर आलं धक्कादायक सत्य

Ghost Hunting : महादेवाच्या नगरीत भूताची दहशत; VIDEO VIRAL होताच समोर आलं धक्कादायक सत्य

कॅमेऱ्यात कैद झालं भूत

कॅमेऱ्यात कैद झालं भूत

वाराणसीतील भूत कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

**अभिषेक जायसवाल/**वाराणसी, 24 सप्टेंबर : उत्तर प्रदेशमधील वाराणसी म्हणजे काशी म्हणजे महादेवाची नगरी. पण याच महादेवाच्या नगरीतील नागरिक सध्या दहशतीत आहे. इथं भूत दिसला आहे, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी लोक घऱाबाहेर पडण्यासही घाबरत आहे.  वाराणसीतील हा भूत कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बडीगैबी परिसरातील व्हीडीए कॉलनीतील ही घटना आहे. इथं रात्रीच्या वेळी पांढऱ्या रंगाची आकृती दिसली. पार्क आणि छतांवर ही आकृती फिरत होती. ही आकृती म्हणजे भूतच आहे, असं सर्वजण म्हणू लागले. काही दिवसांपूर्वीचाच हा व्हिडीओ आहे. यामुळे कॉलनीत खळबळ माजली.  व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक पांढऱ्या रंगाची आकृती हलताना दिसते आहे. ही आकृती कधी रस्त्यावर, कधी पार्कात फिरताना दिसते. कधी छतावर बसलेली तर कधी चालताना दिसते आहे. हे वाचा -  गायीची आत्महत्या म्हणून VIDEO VIRAL; प्रत्यक्षात तिथं काय घडलं इथं पाहा दरम्यान खरंच या परिसरात भूत आहे का? व्हिडीओत दिसणारी ती पांढरी आकृती नेमकी कसली? याचा तपास न्यूज 18 ने केला. तेव्हा वाराणतीतील भूताच्या या व्हायरल व्हिडीओमागील धक्कादायक सत्य समोर आलं. या व्हिडीओची पडताळणी केली असतात एक नव्हे तर असे तीन तीन व्हिडीओ समोर आले. सुरुवातीचा व्हिडीओ पाहून लोक घाबरले. त्यांना ही आकृती म्हणजे भूतच वाटलं. पण नंतरचे दोन व्हिडीओ पाहिले तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. कारण ज्याला ते भूत समजत होते ते प्रत्यक्षात भूत नव्हतं. कॉलनीतील लोकांना घाबरवण्यासाठी कुणीतरी असं केलं होतं.

इथं राहणाऱ्या गणेश शर्माने सांगितलं की कॉलनीच्या सोशल मीडिया ग्रुपवर काही मुलांनी हा व्हिडीओ बनवल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी बाहेरील लोकांवर आरोप लावला. हे वाचा -  OMG! जाळ्यात अडकलेला विचित्र मासा पाहून मच्छिमारही शॉक; पाहून तुम्ही सांगा कोण आहे हा? लोकांना त्रास देण्यासाठी किंवा मजा म्हणून हे सर्व करण्यात आलं आणि आता प्रकरण खूप मोठं झालं आहे. तेव्हा स्थानिक लोकांनी याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. अफवा पसरवल्याच्या आरोपात स्थानिक लोक पोलिसात तक्रार करण्याचा विचार करत आहेत, असं शर्मा म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात